Sunday, September 24, 2017

तत्त्वनिष्ठ अरूण साधू

It was wet gray Wednsday!...हे वाक्य आहे अरूण साधूंनी लिहीलेल्या पावसाळ्यातल्या दिवसात लिहीलेल्या एका बातमीचं! सामान्यतः अशा प्रकारच्या वाक्याने बातमीचा इंट्रो लिहीला जात नाही. एखाद्या रिपोर्टरने असे वाक्य लिहीलेच तर वृत्तसंपादक किंवा प्रमुख उपसंपादक ती बातमी रिपोर्टच्या अंगावर फेकून त्याला ती बातमी पुन्हा लिहायला सांगेल. त्या काळात अरूण हे नाव मोठे नव्हते. परंतु त्यांनी लिहीलेली बातमी इंडियन एक्सप्रेसच्या न्यूज डेस्कवरीस सगळ्यांना इतकी आलडली की त्या बातमीतले एकही वाक्य न बदलता ती बातमी इंडियन एक्सप्रेसच्या त्या दिवशीच्या अंकाची हेडलाईन म्हणून छापण्याचा एकमुखी निर्णय झाला.अरूण साधू हा सामान्य रिपोर्टरपेक्षा कितीतरी मोठा आहे हे त्या दिवशी लोकसत्ता आणि इंडियन एक्स्प्रेसच्या संपादक मंडळींच्या लक्षात आले.
रात्री काम आटोपल्यावर अरूण साधू गप्पा मारायला लोकसत्तेच्या न्यूजडेस्कवर येऊन बसायचे. आमचंही काम संपलेलं असायचं. आमचा गप्पांचा फड रंगायचा. भाऊ कायंदे ह्यांच्याशी तर कुठल्यातरी मुद्दयावरून वादावादीसुध्दा व्हायची! अशा प्रकारची वादावादी झाली तरी कुठल्याही प्रकारची कटुता कधीच शिल्लक राहात नसे.
कालान्तराने साधू एक्स्प्रेस सोडून गेले. टाईम्स, फ्री प्रेस आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा प्रवास सुरू झाला. अधुनमधून ते प्रेसकॉन्फरन्समध्ये भेटतही. पण बोलणं अगदी माफक. जितक्यास तितकं! परग्रहावरून आल्यासारखे ते बोलत. प्रेसकॉन्फरन्स संपल्यावर भेटवलस्तू नाकारायचे.त्या बाबती त्यांची भूमिका स्पष्ट होती. ते म्हणायचे, इट अमाऊंटस् टू नेक्सस!
प्रेसकॉन्फरन्यमध्ये केलेल्या वक्तव्यास प्रसिध्दी देतो तेव्हा पत्रकारांना गिफ्ट मिळाली म्हणून त्यांनी बातमी दिली असे म्हणता येत नाही असा अन्य पत्रकारांचा युक्तिवाद साधूंना मान्य नव्हता.
माणूस साप्ताहिकात त्यांची फिडेल चे आणि क्रांती़ ही लेखमाला सुरू होती. नंतर त्यांची सिंहासन कादंबरी आली. त्या कादंबरीवर सिनेमाही निघाला. त्या काळात गाजलेल्या संपसम्राट जॉर्ज फर्नाडिंस, मृणाल गोरे ह्यांची आंदोलने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक कशा प्रकारे हाताळत असत ह्याचे जिवंत दर्शन अरूण साधूंनी सिंहासनमधून घडवले. म्हणून ही कादबंरी मराठी वाचकांना भावली. सिनेमाही गाजला. नंतरच्या काळात त्यांनी एक्सप्रेस सोडला.

राष्ट्पती प्रतिभा पाटील ह्यांना साहित्य संमेलनला निमंत्रित करण्यात आले तेव्हा राष्ट्रपतीचा प्रोटोक़ल सांभाळण्याचा आयोजकांनी प्रयत्न केला हे त्यांना आवडले नाही. म्हणून संमेलावर त्यांनी बहिष्कार घातला पत्रकार ह्या नात्याने राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल मान्य करावा लागतो हे त्यांना ठाऊक नव्हते असे म्हणता येत नाही.परंतु त्यांनी एकदा जी भूमिका घेतली त्यावर ते ठाम राहिले हे मात्र खरे. 
रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: