Thursday, April 30, 2020

महाराष्ट्र सुसंपन्न होओ!


आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६० वर्षें पुरी झाली. मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, ब-हाणपूर  ह्यांचा महाराष्ट्रात समावेश असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावे म्हणून समितीने उभारलेले आंदोलन पाहाता पाहता राज्यव्यापी झाले. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून गुरातच्या नेत्यांनी काँग्रेसवर दबाव आणला होता. त्या दबावाला पं. जवाहरलाल नेहरू बळी पडले! भाषावार प्रांत रचनेच्या तत्त्त्वानुसार देशभरात भाषावार प्रांत स्थापन झाले. महाराष्ट्र मात्र अपवाद ठरला. मुंबई माहाराष्ट्राला मिळू नये म्हणून गुजरात आणि महाराष्ट्र असा व्दिभाषिक राज्याचा घाट घालण्यात आला. त्यानुसार नेहरूंनी महाराष्ट्र आणि गुजराता अशा व्दिभाषिक राज्याची स्थआपना केली. हा मराठीभआषकांवर उघड उघड अन्याय होता. व्दिभाषक मुंबई राज्याचे मोरारजी देसाई मुख्यमंत्री झआले. आंदोलन चिरडून काढण्यासाठी मोरारजींनी कसोशीने प्रयत्न केले. फ्लोरा फाऊंटन भागात आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात १०५ मराठी माणसे ठार झाली. गोळीबाराच्या घटनेमुळे आंदोलन शमले तर नाहीच उलट, अधिक तीव्र झाले. देशभर लोकप्रिय असलेले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ह्यांच्या लोकप्रियतेला महाराष्ट्रात ओहोटी लागली. ठिकठिकाणी नेहरूंचे काळ्या झेंड्यांनी स्वागत झाले. थोडी कळ काढा, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी मी नेहरूंचे मन वळवीन अशी भाषा त्या काळात यशवंतराव चव्हाणांची होती. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करताना कम्युनिस्ट पक्ष काँग्रेसपेक्षा प्रबळ होऊ नये एवढेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र होते. ऐन चळवळीच्या काळात झालेल्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला विधानसभेत शंभरहून जास्त जागा मिळाल्या. मुंबई महापालिकेत तर संयुक्त महाराष्ट्र समितीची सत्ता आली. तरीही महाराष्ट्रातल्या राजकारणाला संघर्षाचे वळण लागले तरी दाक्षिणात्य राज्यातल्या वळणाइतके ते गंभीर नव्हते. महाराष्ट्राने काँग्रेसला विरोध केला, नेहरूंना विरोध केला! पण हा विरोध मुद्द्यापुरताच होता. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या मागणीपुरताच होता! विरोध करताना महाराष्ट्राची विवेकबुध्दी कधी सुटली नाही. ह्या संयमी विरोधाची दखल शेवटी नेहरूंना घ्यावीच लागली. इंदिराजींना महाराष्ट्रासंबंधी, महाराष्ट्रातल्या लोकभावनांविषयी अहवाल सादर करण्यास काँग्रेसने सांगितले. इंदिराजींनी महाराष्ट्राचा दौरा करून महाराष्ट्राची मागणी न्याय्य असल्याचा अहवाल दिला. काँग्रेस कार्यकारिणीने तो स्वीकारला. महाराष्ट्र राज्यनिर्मितीसाठी केंद्राची चक्रे फिरली. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले! कालान्तराने
फ्लोरा फाऊंटनला हुतात्मा स्मारक झाले. ह्या भागाचे हुतात्मा चौक असे नामकरणी करण्यात आले. महाराष्ट्राच्या  लढ्याची सूत्रे वरळीतील शिवशक्ती ह्या मराठा दैनिकाच्या कार्यालयातून हलत होती. त्या काळात मराठाच्या संपादक मंडळात आचार्य अत्रे ह्यांचे निकटवर्ती असलेले चीफ सबएडिटर वसंत देशपांडे ह्यांनी माझ्या विनंतीवरून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना लेख लिहला. तो लेख मुळात वाचण्यासारखा आहे. म्हणून तो लेख माझ्या संकेतस्थळावर अतिथी पानावर दिला आहे. अवश्य वाचा!
 वसंत देशपांडे ह्यांचा लेख- संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
 (  लिंक- https://wp.me/PaK76Y-8A  )

महाराष्ट्र सुसंपन्न होओ अशी य़ुभेच्छा देत असताना देशभरातील प्रत्येक नागरिकाला मनात केंद्राच्या हडेलहप्पीबद्दल चिंता वाटते. देशाला फेडरलिझम मान्य आहे. पण तथाकथित अ. भा. पक्षाच्या नावाखाली फ्युडलिझम मात्र मान्य नाही. आजवर महाराष्ट्राने विनम्रता कधीच सोडली नाही. केंद्रात अनेकदा सत्तापालट होऊही केंद्रातले मंत्री मात्र त्यांचा तोरा सोडायला तयार नाहीत. तोरा मिरवण्याच्या केंद्रीय नेत्यांच्या मनोवृत्तीमुळे देशाच्या लोकशाही प्रवासास अडथळे उत्पन्न होऊ शकतात ह्याचे भान केंद्रीय सत्ताधा-यांनी बाळगणे आवश्यक आहे.

रमेश झवर ज्येष्ठ पत्रकार

  
 ह्या संकेतस्थळाला अवश्य भेट  द्या-      https://wp.me/PaK76Y-8A

Wednesday, April 29, 2020

बुडित कर्जांचे निर्लेखन!


केंद्र सरकारच्या मित्रांची कर्जे सरकारी बँकांनी माफ केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहूल गांधींनी केला. त्यांचा आरोपाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आणि माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी कडक समाचार घेतला. त्यांच्या खुलाशामुळे सकृतदर्शनी तरी राहूल गांधींना मुहतोड जबाब मिळाला ह्यात शंका नाही. पण एवढी मोठी रक्कम बॅंकांच्या नफातोटा पत्रकातून का काढून टाकावी लागते ह्याचा खुलासा मात्र गोघा मंत्र्यांनी केला नाही. हा खुलासा कदाचित् पियूष गोयल ह्यांनी अधिक चांगल्या प्रकारे केला असता. त्यांनी तसा तो केला असता तर  राहूल गांधींबरोबर आम जनतेचेही प्रबोधन झाले असते. पण भल्याभल्यांची पोलखोल करणारा हे पुण्यकर्म पियूष गोयल ह्यांनीही मुळीच केले नसते!
बँकेचे बुडित कर्ज काढून बॅलन्सशीटमधून काढून टाकल्याखेरीज बॅलन्सशीट बँकेबल होऊ शकत नाही. दुस-या शब्दात सांगायचे तर व्यवसाय सुरू करण्यासाठी निर्दोष बॅलवन्सशीट सादर करण्याचा चुकारपणा एखाद्या संस्थेने किंवा व्यक्तीने केला तर ती संस्था किंवा व्यक्ति कर्ज मिळण्यास तत्काळ अपात्र ठरते. त्या उद्योगाला पुनश्च हरीओम करण्याची संधी मिळणार नाही. निव्वळ सरकारी मालकीच्या बँकांनी १.९४ लाख कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित केली असून अन्य बँकांच्या निर्लेखित कर्जाचा आकडा ह्या रकमेत मिळवला तर निर्लेखित कर्जाचा आकडा २.५४ लाख कोटींच्या घरात जातो. आकड्यांची ही जादू का करावी लागते ह्याचे ज्ञान देशभरातील जनतेपैकी एक टक्के जनतेला तरी असेल की नाही ह्याबद्दल शंका वाटते. बँकेबल  बॅलन्सशीट सादर करण्यात सरकारी बँकांना किंवा खासगी बँकांना अपयश आले तर त्या ह्या सा-या बँकांना बँक व्यवयायातून गाशा गुंडालण्याची वेळ येईल. योग्य बॅलन्सशीट नसेल तर कोणालाही कर्ज मिळू शकत नाही. सरकारी क्षेत्रातील उद्योगांना ही नियम जितका लागू आहे तितकाच तो रिझर्व्ह बँकेसह सरकारी मालकीच्या बँकांना हा नियम लागू आहे. ह्या सगळ्यांनी वस्तुस्थितीनिदर्शक म्हणजे खेरखुरे बॅलन्सशीट सादर केले तर त्यांना एक रूपयाचे कर्ज मिळण्यास मारामार पडेल!  
निर्लेखित ( write off ) करण्याची वेब डिक्शनरीत मोढी मार्मिक व्याख्या दिली आहे. write-off
1an elimination of an item from the books of account 2aa reduction in book value of an item (as by way of depreciation) ba tax deduction of an amount of depreciation, expense, or loss. क्रियापदवाचक Wrote offwritten offwriting offwrites off transitive verb 1to eliminate (an asset) from the books enter as a loss or expensewrite off a bad loan 2to regard or concede to be lostmost were content to write off 1979 and look optimistically ahead. written off as an expatriate highbrow
दुर्दैवाने निर्लेखनासंबंधीचे वस्तुसत्य जगभऱातील गरीब लोकांना माहित नाही. भारतातील गरीब शेतक-यांना तर नाहीच नाही! म्हणूनच आजवर त्यांना सरकारकडून सब्सिडी दिली जाते. समजा, त्यांना कर्ज माफ केले तर त्या कर्जाची संपूर्ण रक्कम सरकार बँकांना चुकती करते.
अलीकडच्या काळात खासगी उद्योगांला हवे तेवढे भांडवल बँका उपलब्ध करतात. आणि शेतक-यांना किंवा सामान्य माणसाला मात्र प्रसंगी हजारपाचशे रुपयांसाठी पायपीट करावी लागते! अलीकडे तर त्यांना सब्सिडीची भीक घालायलाही अलीकडे सरकार तयार नाही. ह्याउलट, त्यांना वन टाईम युनिव्हर्सल इन्कमम्हणजेच वर्षांकाठी २५ हजारांपासून ते २-३ लाखांपर्यतची रक्कम त्यांच्याकडे फेकली की सरकारचे काम संपले असा नवा फंडा जगभऱातील सरकारांनी शोधून काढला. माजी अर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम ह्यांनी भारतालाही तो चूपचाप सुचवला. गरिबांची पध्दतशीर बोळवण करण्याचा हा फंडा अर्थात भारतानेही तो चूपचाप स्वीकारला!
पूर्वी कम्युनिस्ट खासदार लोकसभेत भाषण करताना वारंवार खोट्या आकडेवारीचा मुद्दा उचलून धरायचे. कम्युनिस्टांच्या युनियन नेहमी कंपन्यांच्या खोट्या बॅलन्सशीटविरूध्द आवाज उठवायचे. आता काळ बदलला आहे. हल्लीचे बँक अधिकारी बॅलन्सशीट खोटे आहे असे सांगत नाहीत. There seems to be launae in the balance sheet, असे हळू आवाजात बँकग्राहाकांना सांगतात आणि कर्ज मिळू शकेल ह्या दृष्टीने बॅलन्सषीटचे पुनर्लेखन करा, असे सुचवतात! अर्थात बॅलन्सशीटचे पुनर्लेखन केले तरी कर्ज बुडाल्याने बँकेला आलेला मूळ तोटा नाहीसा होत नाही. वा-याने नकाशा फडफडला नसला तरी देशात धरणीकंप होणारच नाही असे मुळीच नाही. राम गणएश गडकरींचे सुभआषित उलट्या अर्थाने बॅलन्सशीटलाही लागू पडते!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार  
  

Monday, April 27, 2020

महाभारतातले राजकारण-२


कौरवांच्या दरबारात झालेल्या सर्वस्वान्तकारक द्युतात द्यूतविषयक सारे संकेत पायदळी तुडवले गेले होते हे आपण महाभारतातले राजकारण-१ ह्या लेखात पाहिले. द्युतात हरल्यावर पांडवांना १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. वेष आणि नाव बदलून पांडवांनी मत्य्स्य देशाच्या राजदरबारात अज्ञातवासाचे एक वर्ष काढले. भीम-अर्जुन ह्यांच्या मनात सरळ हस्तिनापूरशी युध्द करून दुर्योधनादि अन्यायी कौरवांना ठार मारायचे होते.
परंतु राजकारण धुरंधर श्रीकृष्णाने युध्दाची जबाबादारी कौरवांवर टाकण्याच्या हेतून राज्याची मागणी करण्यासाठी कौरवांकडे दूत पाठवण्याची सूचना केली. त्या सुचनेनुसार विराटाच्या पुरोहिताला कौरव दरबारात दूत म्हणून पाठवण्यात आले. दूत ह्या नात्याने तो पुरोहित कमी पडला. पांडवांनी दूत पाठवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून धृतराष्ट्रानेही संजयला पांडवांकडे दूत म्हणून पाठवले. कारण इंद्रप्रस्थाचे राज्य पांडवांना परत करण्यास तोही मनोमन तयार नव्हता. राज्य परत करण्यात पुत्रमोह धृतराष्ट्राच्या आड आला. युध्दात कौरवांचा पांडवांपुढे टिकाव लागणार नाही अशी धृतराष्ट्राला भीती वाटू लागली. म्हणून कसेही करून युध्द टाळण्याची खटपट त्याने सुरू केली. स्वतःची बाजू मांडण्यासाठी संजयला पाडवावकडे पाठवण्याचा निर्णय धृतराष्ट्राने घेतला. जमल्यास युधिष्ठिराच्या न्यायी स्वभावाचा फायदा घेऊन त्याला अन्य भावांकडून वेगळा पाडण्याचा प्रयत्न करता आला तर पाहावा असाही धृतराष्ट्राचा सुप्त हेतू होताच. त्याच्या आदेशानुसार लगोलग संजय मत्स्यदेशाकडे दूत म्हणून कामगिरी बजावण्यासाठी निघालादेखील.
मत्यस्यदेशाच्या दरबारात दूक ह्या नात्याने संजयने मार्मिक भाषणे केले. खरे तर अज्ञआतवासाचा कालावधी पुरा व्हायच्या आत अर्जुन पकडला गेला, सबब अज्ञातवासाच्या अटीचा पांडवांकून भंग झाल्याचा  दावा दुर्धनाने केला होता. त्याचाच फायदा दुर्योधनाप्रमाणे धृतराष्ट्रही घेऊ इच्छित होता. वस्तुतः भीष्माच्या मते पांडवांचा अज्ञातवासाचा कालावधी पूर्ण झाला होता. अत्ज्ञातवास पुरा झाल्याची खात्री नसती तर मुळात शमीच्या झाडावर बांधून ठेवलेली राजवस्त्रे आणि शस्त्रास्त्रे अर्जुनाने काढून आणलीच नसती. गौळीवाडा लुटायला आलेल्या कौरव सैन्याशी लढायला गेल्या राजपुत्र उत्तर ह्याला सारथ्य करायला लावलेच नसते. अज्ञातवासाचा नियमभंग करून कौरवांशी युध्द करण्याचा मूर्खपणा त्याने केला नसता. अज्ञातवास सुरू होण्याचे आणि तो संपण्याचे पांडवांचे गणित सोपे होते, इंद्र दरबारात अप्सरेने दिलेल्या शापानुसार त्याचे पौरषत्व ज्या दिवशी सुरू झाले त्याच दिवशी पांडवांचा अज्ञातवास सुरू झाला आणि ज्या दिवशी अर्जुनाचे पौरूषत्व परत आले त्याच दिवशी अज्ञातवासही संपला!      
गीतेत विषादयोगात अर्जुनाने ऐनवेळा सीदन्ती मम गात्राणी म्हणत युध्द करायला नकार दिला. त्यावेळी जो युक्तिवाद त्याने केला तोच युक्तिवाद संजयने दूत ह्या नात्याने पांडवाकडे केला. युध्द करून स्वकियांना ठार मारण्यापेक्षा भिक्षा मागून उदारनिर्वाह करणे जास्त युक्त ठरेल असे संजयने प्रतिपादन केले.  राजाला  धृतराष्ट्राला पांडवांची सतत आठवण येतेय्. दुर्योधन हा मंदबुध्दी आहे. राजा धृतराष्ट्राला पांडवांबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत. दुर्योधन पांडवाशी द्रोह करतो ह्याबद्दल राजा धृतराष्ट्र व्यथित आहे. राजा धृतराष्ट्र भातृकलह पाप समजतो. युध्दात कोणाचाही जय झाला तरी तो श्रेयस्कर ठरणारा नाही. कारण, युध्द हे विनाशकारी, पापमय, नरकहेतू निरर्थक कर्म असते. युधिष्ठरसारख्या धर्मशील माणसाने शांतीचा वध करणारे असले नीचपणाचे युध्द करू नये हेच योग्य ठरते, पुत्र, बंधू सगेसोयरे इत्यादींना ठार मारण्यात शांति आणि कल्याण नाही. भीष्म आणि राजा धृराष्ट्र ह्या दोघांनाही संधी अभिमत आहे असेही संजयने शेवटी सांगतले. त्याच्या युक्तिवादात गीतेत अर्जुनाने उपस्थित केलेले सारे मुद्दे आले आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनावा गीतेत केलेला उपदेश अर्जुनापेक्षा धृतराष्ट्राला जास्त लागू पडतो! म्हणूनच गीतेत धृतराष्ट्राच्या आणि संजयच्या तोंडी अनेक श्लोक आहेत. अर्जुनाचे निमित्त करून धृतराष्ट्राचे सगळे मुद्दे श्रीकृष्णाने गीत्तेतच खोडून काढले.
संजयच्या युक्तिवादाला युधिष्ठिरने अतिशय समर्पक उत्तर दिले. राजा धृतराष्ट्र आणि संजय ह्या दोघांबद्दल आदरभाव व्यक्त करून युधिष्ठिर म्हणाला, कौरवांमुळे पांडवांना जो क्लेश सहन करावा लागला त्याबद्दल एकवेळ कौरवांना क्षमा करता येईल, पण त्यासाठी इंद्रप्रस्थाचे आमचे राज्य सुयोधनाने आम्हाला परत केले पाहिजे. त्यावर संजय म्हणाला, जीवन अनित्य आहे. त्यासाठी कीर्ती नष्ट होऊ देणे योग्य नाही. दुर्योधनाने राज्य परत केले नाही तर पांडवांनी राज्यात भिक्षा मागून उदारनिर्वाह केलेला बरा. परंतु युध्सारखे घोर पापकर्म करणे उचित नाही. कामना ही धर्माचरणात विघ्न आणते. ती कामना सोडून देऊन युधिष्ठिरने ह्या लोकात आणि परलोकात सुखी होणे जास्त चांगले!
संजय हा सत्पुरूष होता. महात्मा अशीच त्यांची कीर्ती होती. तरीही राजकारणाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याचीही कामगिरी मुत्सद्देगिरीची होती. धृराष्ट्राच्या इच्छेनुसार संजयचा युक्तिवाद युध्द टाळण्यासाठी होता. पांडवांना आणि श्रीकृष्णाला तर युध्द हवेच होते. श्रीकृष्ण राजकारणचतुर होता. युध्द करण्याची दुर्योधनाची इच्छा आहे, पांडवांची नाही असा आभास उत्पन्न करण्यात श्रीकृष्ण कमालीचा यशस्वी ठरला. साहजिकच पांडवांचा दूत म्हणून तो शिष्टाई करण्यास कौरव दरबारात गेला. अर्थात दूत म्हणून श्रीकृष्णाखेरीज पांडवांकडे अन्य कोण अधिकारी व्यक्ती होती? तो पांडवांचा मामेभाऊ तर होताच, शिवाय सुरूवातीपासूनच श्रीकृष्णाला पांडवांचा हिततचिंतक होता.  त्तत्कालीन भारतवर्षातल्या राजे मंडळात श्रीकृष्णासारखा कर्तृत्वान, सामर्थ्यशाली, निःस्पृह, निःस्वार्थी वीर योध्दा असा कुणी नव्हता. युध् केव्हा करावे आणि केव्हा युध्दातून पळून जावे हे तो चांगलेच जाणत होता. तो चांगला वक्ता होता. न्यायी आणि धुरंधर राजकारणी असा त्याचा भारतभर लौकिक होता. योध्दा ह्या नात्याने त्याने व्दारकेच्या शत्रूंना अनेकदा धूळ चारली होती.
दूत म्हणून कौरव दरबारात जाण्यासाठी पांडवांनी श्रीकृष्णाला विनंती केली तेव्हा द्रौपदी आणि भीम हे दोघे उगाच चिंतेत पडले. दौपदीला भरदरबारात खेचून आणून तिचे वस्त्र फेडणा-या दुःशासनाला ठार मारून त्याच्या रक्ताने द्रौपदीची वेणी घालण्याच्या प्रतिज्ञेचे काय होणार ही भीमाची चिंता तर स्त्री म्हणून झालेल्या अपमानाचा बदला घेतल्याखेरीज द्रौपदीला स्वस्थ राहूच शकत नव्हती.
पंडुच्या पश्र्च्यात धृतराष्ट्राच्या शिरावर राजमुकूट ठेवण्यात आला खरा, पण तो तात्पुरती व्यवस्था म्हणून. तत्कालीन मौखिक संकेतानुसार ( सध्याच्या भाषेत घटनात्मकतेनुसार ) राजसिंहासनावर बसण्याचा धृतराष्ट्राला अधिकार नव्हता. कारण, तो अंगहीन( जन्मांध ) होता! धृतराष्ट्र हा हंगामी सत्ताधीश होता. खरी सत्ता युवराज दुर्योधनाच्याच हातात होती. म्हणजेच हस्तिनापूरचे राज्य हे सुसंघटित अराजक होते! राजसिंहासन मिळणे त्या काळात जन्माधिष्ठित होते हे खरे. पण शेवटी राजसिंहासन मिळवण्यासाठी युध्द करावेच लागते असा जगाचा इतिहास आहे. ह्या दृष्टीने पाहिल्यास हस्तिनापुरच्या राजगादीवर बसण्यासाठी पांडवांना युध्द करणे क्रमप्राप्त होते. हस्तिनापूरच्या राजसिंहासनावरील त्याचा हक्क आधी डावलला गेला होताच. इतकेच नव्हे तर निव्वळ तडजोड म्हणून मिळालेले खांडवप्रस्थाचे ( जे पुढे इंद्रप्रस्थ म्हणून विख्यात झाले ) राज्यदेखील कपटद्युताच्या साह्याने दुर्योधनाने हिसकावून घेतले होते. म्हणून युध्दापूर्वी राज्या परत मिळणअयाची रीतसर मागणी कौरव दरबारात करण्याची अपरिहार्यता लक्षात घेतली पाहिजे. श्रीकृष्णाने ती कामगिरी कौरव दरबारात चोख पार पाडली. पांडवांनी द्युताच्या सा-या अटींचे पालनही केले होते. तरीही पांडवांना अज्ञातवासात गाठून पुन्हा वनवास आणि अज्ञातवास भोगायला लावण्याची शकुनीची आणि दुर्योधनाची योजना होती. पण ती मुळीच यशस्वी झाली नाही.
दुर्योधनाने आणखी एक चूक केली. कौरव दरबारात श्रीकृष्णाचे भाषण सुरू असताना दुर्योधनाने सभात्याग केला. इतकेच नव्हे तर, श्रीकृष्णाला पकडून बंदीवासात टाकण्याच्या तयारीला तो लागला. श्रीकृष्णाला हे जेव्हा समजले तेव्हा भर दरबारातच श्रीकृष्ण म्हणाला, असेल हिंमत तर मला पकडून दाखवा! तसे कशाला? मीच दुर्योधनाला पकडतो तुरूंगात टाकतो. परंतु धृतराष्ट्राच्या आज्ञेवाचून इथे मी युध्द करणे योग्य नाही. नंतर तो कौरव दरबारातून विदुराच्या घराकडे निघून गेला. मत्स्यदेशात परत जाण्यापूर्वी त्याने कर्णाची गाठ घेतली. कर्णाला त्याचे जन्मरहस्य श्रीकृष्णाने उघड केले. तू पांडवांच्या बाजूला आला तर पांडव तुझे स्वागत करतील. युधिष्ठिरासह सारे पांडव आणि द्रौपदी राजा मानतील असे त्याने कर्णास सांगितले. परंतु कर्ण ते मान्य करणार नाही हे श्रीकृष्णाला माहित होते. अर्जुनाखेरीज अन्य पांडवाशी युध्द न करण्याचे आश्वासन उदार कर्णाकडून त्याने मिळवले!
शिष्टाईनिमित्त रंगलेल्या राजकारणाखेरीज अनेक प्रसंग प्रसंग महाभारतात आहेत. परंतु तुलनेने ते किरकोळच मानावे लागतील. त्यांचा परामर्ष पुन्हा केव्हा तरी!
(हा लेख द. ल. शिवलकरलिखित श्रीमद्भग्वद्गितेचे लक्ष्य कोण?’ ह्या पुस्तकाच्या आधारे लिहला आहे.)
रमेश झवर
ज्येषठ पत्रकार

कोरोना चिंता

महाराष्ट्रात झालेली कोरोना रूग्णांच्या संख्येतली वाढ चिंताजनक आहे. रविवारी राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ८०६८ वर गेली तर कोरोना मृत्यूचा आकडा ३४२ वर गेला. धारावीतच रूग्णांची आणि बळींची संख्या वाढल्याने राज्यातील आणि मुंबईतील रूग्ण तसेच बळींची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. अर्थात रूग्णांवर उपचार केल्यानंतर बरे झालेल्यांच्या  संख्येतही वाढ झाली आहे. आकडेवारीबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त करण्याचे कारण नाही. परंतु कोरोना रूग्णांची संख्या का वाढली ह्याबद्दलची कारणमीमांसा पुरेशी आहे असे म्हणता येणार नाही.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पिंपरी-चिंचवड, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर ही राज्यातली अफाट गर्दीची आणि दाट लोकसंख्येची शहरे आहेत. ह्या सा-या शहरात परप्रांतीय तसेच राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या मजुरांचा भरणाही अधिक आहे. बहुतेक परप्रांतीय मजूर हे १०x१२ च्या खोलीत एकत्र राहतात. तेथेच स्वैंपाक-आंघोळी करतात आणि कामावर किंवा मोलमजुरी करण्यासाठी बाहेर पडतात! त्यामुळे सुरक्षित अंतर राखून दैनंदिन व्यवहार पार पाडणे जवळ जवळ अशक्यप्राय आहे. मात्र, हे कोणी विचारात घ्यायला तयार नाही. परिणामी संचारबंदी कम् टाळेबंदीची अमलबजावणी करणे प्रशासनाला अत्यंत अवघड होऊन बसले. खरेतर, स्थानिक प्रशसनाच्या समस्यांना अंत नाही. भाजीपाला, अन्नधान्य घेण्यासाठी उडालेली झुंबड आधी रोखायची की आधी रूग्ण हुडकून काढायचे ही प्रशासनाची दुहेरी समस्या आहे. अपुरा कर्मचारीवर्ग हीदेखील मोठी समस्या आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. कोरोना पेशंटना तपासण्यासाठी आवश्य असलेले किट्स उपलब्ध नसतील तर ते कसे उपलब्ध करून द्यायचे हीदेखील समस्या आहेच. त्यात चीनमधून आयात करण्यात आलेल्या किट्समध्ये आयातदारांनी नफा कमावल्याच्या बातम्या आहेत! थोडक्यात, केंद्रीय आरोग्य खात्याच्या दिशानिर्देशानुसार आरोग्य सेवा पुरवणे दिवसेंदिवस अवघड होत गेले आहे. कोरोनाशी लढणा-या सैनिकांचा गौरव करणारी भाषणे ठोकली गेली. ती भाषणे ऐकून कष्टाळू आरोग्य सेवकांचे कान किटले असतील तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही! एकीकडे त्यांना कोरोना लढाईचे सैनिक संबोधायचे आणि दुसरीकडे त्यांच्या हाताता शस्त्रे असूही नये हा मोठा विरोधाभास सध्या देशात दिसत आहे.
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाऊ देण्यासाठी रेल्वेने खास गाड्या सोडाव्यात अशी सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांनी केली. उध्दव ठाकरेंच्या सूचनेवर रेल्वेने अद्याप विचार केला नाही; इतकेच नव्हे तर, विशेष गाड्या सोडण्यास केंद्राने स्पष्ट नकारही दिलेला नाही. स्वतःला परिस्थिती हाताळता येत नसेल तर ती राज्या सरकारांच्या मदतीने हाताळली पाहिजे ही साधी गोष्टही केंद्रीय नेत्यांना उमगू नये? केंद्रीय परिपत्रकात नित्य नवे बदल केले गेले. ह्याचा अर्थ केंद्राची यंत्रणा कच्ची आहे असा होतो का ? की केंद्राची यंत्रणा दबावाखाली काम करत आहे?
रोज दुपारी ४ वाजता होणा-या प्रेसब्रिफींगमध्येही रोज भारतातल्या परिस्थितीची जागतिक परिस्थितीशी तुलना केली जात आहे. ही तुलना कितपत प्रस्तुत आहे? अजिबात तुलना करू नये असे मुळीच सुचवायचे नाही. परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या बाबतीत भारताची कामगिरी इतर देशांच्या तुलनेने सरस आहे असा सूर लावण्याचे कारण नाही. भारतातल्या परिस्थितीचे अधिक सखोल आणि अधिक वस्तुनिष्ठ परीक्षण-निरीक्षण संबंधित यंत्रणांनी केलेच पाहिजे. त्यात आत्मसमर्थनाचा भाग असू नये. तपासणीचे निकष-नियमही कुठले पाळले गेले कुठले पाळले गेले नाही, पाळले गेले नसतील तर त्याची कारणे काय ह्याचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण आवश्यक आहे. कोरोना लढाई सगळ्या राज्यांनी मिळून लढायची आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर राजकारण केल्याचा आरोप केला तर तसाच आरोप सत्ताधारी पक्षावर केला आहे. राज्यातल्या विरोधकांना राज्याबद्दल खरोखरच प्रेम असेल तर राज्याला १ लाख कोटींचे पॅकेज मिळावे ह्या शरद पवारांनी केलेल्या मागणीस विरोधी नेते देवेंद्र फडणवीस ह्यांनी पाठिंबा द्यावा आणि दिल्ली दरबारात आपले वजन वापरावे. ते करण्याऐवजी रेशनिंग दुकानात धान्य मिळत नाही अशा तक्रारी ते करत बसले आहेत. वास्तविक अन्नधान्य मिळत नसल्याची तक्रार त्यांनी शेलारमामांकडे सोपवणे अधिक बरे. आमदारकीचा प्रश्न तर शेलारनीही लावून धरला! हा प्रश्न संजय राऊतनी उकरून काढला हे खरे आहे. परंतु तो काढताना त्यांनी अतिशय संयमपूर्ण भाषा वापरली हे विसरून चालणार नाही. खरे तर, आधी कोरोना-लढाई, नंतर राजकारण हाच सद्यस्थितीत प्रशस्त मार्ग आहे.
रमेश झवर

Sunday, April 26, 2020


कृष्णाष्टमी, रामजन्मोत्सव आणि हनुमानजयंती!  भारतात ज्याची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते त्यात पर्शुरामाचेही नाव घेतले पाहिजे. भगवान पर्शुराम रामरावण युध्दानंतर २०० वर्षांनी आणि महाभारत युध्दाच्या ६०० वर्षांआधी ह्या काळात केव्हातरी होऊन गेला. पुराणात त्याच्या कर्तृत्वाविषयी खूपच माहिती मिळते. पर्शुराम हा विष्णूच्या १० अवतारांपैकी एक!  भार्गव पर्शुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आणि वडिल जमदग्नीच्या सांगण्यावरून त्याने आपली आई रेणुका हिला ठार मारले (?) ह्या दोन गोष्टी मात्र भार्गव पर्शुरामाच्या जीवनाशी निगडित आहेत. बाकी कशाबद्दलही एकवाक्यता नसली तरी ह्या दोन गोष्टींबद्दल सर्वत्र एकवाक्यता आढळते
हरिवंशात आलेल्या कथेनुसार पर्शुरामाने हैययवंशीय बलाढ्य राजा सह्स्रार्जुन आणि त्याच्या उन्मत्त मांडलिक राजांनाही ठार मारले. त्याच्या कार्यकर्तृत्वाची ही नकारातमक बाजू वगळता त्याने यादववंशीय राजांना आत्मविश्वास प्राप्त करून देण्याचे महद्कार्य केले हे मात्र कोणाला फारसे माहित नाही. तो सप्तसिंधूतून सहस्रार्जुनाचा कैदी म्हणून नर्मदा परिसरात आला होता. तो सहस्रार्जुनाचा कैदी कसा झाला? नर्मदातीरावरील महिष्मतीपासून पश्मिमेकडे उडिशा पर्यंत, पश्चिमेकडे थेट सुराष्ट्र ( सौराष्ट्र ) आणि आनर्त( सध्याचा दक्षिण गुजरात ) आणि परान्त-अपरान्तपर्यंत (  परान्त म्हणजे सध्याचा सुरत परिसर आणि अपरान्त म्हणजे सध्याचे ठाणे आणि उत्तर कोकण ) त्याने मजल मारली. ठाणे प्रांताला लागून असलेल्या भडोच शहराचे नाव हे तर भृगूकृच्छचे अपभ्रंश! चिपळूणजवळच्या टेकडीवर परशुरामाचे भव्य मंदिर उभे असून हा परिसर चित्पावन ब्राह्मणांचे वस्तीस्थान म्हणून ओळखले जाते. चित्पावन ब्राह्मणांच्या उत्त्पत्तीशीही परशुरामाची कथा निगडित आहे. परशुरामाचे भव्य मंदिर ही पर्शुरामभूमीची आणि चित्पावनांच्या उत्त्पत्तीची खूणच! अर्थात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
सहस्रार्जुनाबरोबर परशुरामाचे युध्द हे तोडीस तोड ठरेल. त्या युध्दात परशुरामाने सह्स्रार्जुनास सहज ठार मारले. परशुरामाचे चरित्रही राम-कृष्णाच्या चरित्राइकतेच चित्तथरारक आहे. परशुरामालाही बाळपणापासून अनेक संकटातून जावे लागले. तो लहान असताना दस्यूंनी त्याला पळवून नेले. दस्यूंच्या तावडीतून त्याने स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. ती सुटका करून घेताना पतित मातापित्याच्या पोटी जन्माला आलेल्या त्याच्याच वयाच्या शुनःश्वेपची त्याची भेट होते. तो अंगिरा असल्याचे जेव्हा त्याला समजते तेव्हा त्याला वेदमंत्राचा अधिकार प्राप्त करून देण्याचे आश्वासन तो देतो. परशुरामाच्या जीवनावर गुजराती लेखक कन्हयालाल मुन्शी ह्यांनी गुजरातीत कादंबरी लिहीली आहे. ह्या कादंबरीचे १९५१ साली इंग्रजी भाषान्तर रंगराव दिवाकर ह्यांनी केले. ऋग्वेदात दाशराज्ञ युध्दाचा उल्लेख असलेल्या ऋचा आहेत. त्या ऋचा आणि वैदिक काळावर झालेल्या संशोधनाचा भक्कम आधार मुन्शींच्या कादंबरीला आहे.
आर्यांचे वस्तीस्थान उत्तरध्रुव होते असे अनेक संशोधकांचे मत आहे. त्या काळापासून भृगू ऋषींचे नाव विख्यात होते. भृगू ऋषींचे नाव गीतेच्या विभूतीयोग अध्यायात आले आहे. ‘महर्षीणां भृगूरहं’! परशुराम हा त्याच भृगू वंशाचा. इतर अनेक टोळ्यांप्रमाणे भृगूंचीही आर्यावर्तात आली. हैययवंशयांचे गुरूपद भृगूंकडे होते. परंतु सहस्रार्जुनाच्या उन्मत्तपणाला कंटाळून भृगूंनी त्याचे गुरूपद सोडले आणि ते सप्तसिंधूत परत फिरले. सप्तसिंधूत आर्यांच्या टोळ्या स्थिरावल्या तेव्हा वर्णव्यवस्था मुळीच नव्हती. प्रजेचे संरक्षण करू शकणा-या वर्गाकडे राज्येही आपोआपच आली. तपश्चर्या करून सातत्यपूर्वक ज्ञानोपसानेचा मार्ग  पत्करणा-यांचा आणखी एक वर्ग होता. तोच वर्ग ऋषी म्हणू ओळखला गेला. हे दोन वर्ग असले तरी चातुर्वर्ण्य व्यवस्था अस्तित्वात येण्यास उपनिषदांचा काळ उजाडावा लागला.
भृगू हे ऋषी ऋषीवर्गातले असले तरी खांद्यावर ठेवलेले परशु हातात घेऊन वेळप्रसंगी युध्दास उभे ठाकणारेही होते. परशुरामाचे वडिल जमदग्नी आणि भरतवंशीय गाधीचा पुत्र विश्वरथ ( हाच पुढे विश्वामित्र ऋषी म्हणून ओळखला गेला.) हे तृत्सू राजा दिवोदासाचे राज ऋषी अगस्त्य ह्यांच्या आश्रमात सहशिष्य होते. त्याच आश्रमात दिवोदासपुत्र सुदासही होता.  सप्तसिंधू परिसरात अगस्त्याच्या आश्रमाप्रमाणे लोपामुद्रा, वसिष्ठ आदींचेही आश्रम होते. वसिष्ठ हा अगस्त्यचा बंधू होता. राजर्षीपदात त्याला स्वारस्य नव्हते. खडतर तपश्चर्या करण्यासाठी त्याने सरस्वतीच्या पलीकडील तीरावर स्वतःचा आश्रम स्थापन केला होता. इंद्र, सवितृ, वरूण ह्या देवतांना रोज सरस्वतीच्या पात्रात उभे राहून अर्घ्य अर्पण करण्याचा आणि पितृत्व स्थानी असलेल्या सप्तर्षींना तर्पण करण्याचा ऋषींच्या नित्यक्रमाचा भाग होता. ऋग्वेदातल्या अनेक ऋचा ऋषींना स्फुरल्या त्या सरस्वतीच्या काठी नित्याचरण करत असतानाच्या काळात. भक्तीमार्गाचे मूळ ह्या ऋचातच आहे. हाच सवितृ पुराणांतरी विष्णूच्या रूपात अवतरतो.
स्पर्धा, मतमतान्तरे त्याही काळात वेगवेगळ्या आश्रमात होतीच. विशेषतः आर्यांचे दस्यूंबरोबरचे संबंध हा मतभिन्नतेचा मोठाच मुद्दा होता. आर्यांचे गोधन पळवणे, त्यांच्या मुली पळवणे सीमेलगतच्या भागावर आक्रमण करणे, त्यांचा भूभाग जिंकणे इत्यादी गोष्टी आर्यांच्या दृष्टीने उपद्रवकारक होत्या. एखाद्या घटनेवरून दोन्ही जमातीत सुरू झालेले वैमनस्य दीर्घ काळ चाले. त्याची सावली ऋषींच्या आश्रमावर पडली नसती तरच नवल होते. लोपामुद्रा ह्या स्त्रीऋषीचा आश्रम आणि राजाश्रयप्राप्त अगस्त्य ऋषीचा आश्रम ह्यांच्यातल्या स्पर्धेला जरा वेगळ्या प्रकारची धार होती. दस्यू सरसकट वाईट नाहीत असे लोपामुद्राचे मत होते. आपले मत ती ठासून मांडत असे. अगस्त्य ऋषींना मात्र तिचे मत मान्य नव्हते. नव्हे, ती मांडत असलेल्या मतांचे अगस्त्य वेळोवेळी खंडण करत असत.
दस्यूंचा राजा शांभरच्या सैनिकाने अगस्त्यच्या आश्रमातील विश्वरथला पळवून नेल्याची घटना घडली. त्या घटनेमुळे सप्तसिंधूत एकच खळबळ माजली. विश्वरथला सोडवण्यासाठी सर्व आर्य राजे दिवोदासच्या मदतीला धावून आले. विश्वरथला सोडवून आणण्यात त्यांना यश आले. पण चकमकीच्या काळात दोन अशा घटना घडल्या की सप्तसिंधूतील वातावरण पालटून केले. कोणत्या होत्या त्या २ घटना ? एक म्हणजे शांभर मारला गेला. दुसरी घटनाः विश्वरथ शांभरच्या कैदेत असताना शांभर-कन्या उग्रा विश्वरथच्या प्रेमात पडली. सुरूवातीला विश्वरथने तिला झिडकारून लावले खरे, पण नंतर सवितृ देवतेचा अनुकूल कौल मिळाल्यावर विश्वरथ उग्राशी विवाहबध्द झाला. लोपामुद्रालाही शांभरच्या सैन्याने कैद करून गडावर आणले होते. विश्वरथला सवितृने दिलेला कौल, उग्राचे विश्वरथावरचे शुध्द प्रेम पाहिल्यावर लोपामुद्राची खात्री पटली की शांभऱकन्या उग्रा ही मनाने खरीखुरी आर्य तरूणी आहे. ती निष्पाप आहे. जेव्हा गड जिंकून सगळी मंडळी खाली आली तेव्हा लोपामुद्रा विश्वरथच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली. ती स्वतःही अगस्त्यच्या प्रेमात पडली होती. अगस्त्य तिच्याशी विवाहबध्द झाला. हा सगळा कथाभाग मी येथे देत नाही.
ह्या सा-या घटनांमुळे केवळ दिवोदासच्या राज्यातच नव्हे तर, सप्तसिंधूत एकच खळबळ माजली. दस्यू आणि आर्य ह्यांच्या संबंधांना नवे वळण लागले. विश्वरथची पत्नी उग्राला मुलगा झाला. परंतु तो काळासावळा असल्यामुळे आर्य समाज त्याला स्वीकारणार नाही ह्याची कल्पना लोपामुद्राला आली होती. तिने चलाखीने मुलाला पळवून दुस-या बाळंतिणीच्या खोलीत नेऊन निजवले. आणि तिचे जन्मतः मृत मूल तिने उग्राच्या खाटेवर आणून ठेवले. विश्वरथला झालेला मुलगा मृत असल्याची बातमी तिने दिली. त्यानंतर थोडी शांतता प्रस्थापित झाली. परंतु दरम्यानच्या काळात उग्राच्या मागावर असलेल्या शांभरच्या पुरोहिताने उग्राला ठार मारले. हे सगळे घडत असताना त्याच्या वर्तुणुकीने विश्वरथ लोकप्रिय झाला.  लोकप्रियतेमुळेच तो विश्वामित्र म्हणून ओळखला जाऊ लागला. अगस्त्य आणि लोपामुद्रा दोघेही तृत्सूग्राम सोडून गेले. अगस्त्यच्या आश्रमाचा प्रमुख म्हणून जमदग्नीची नेमणूक केली गेली. त्याला राजर्षी पदही मिळते.
हा सगळा कथाभाग घडत असतानाच्या काळात जमदग्नीची पत्नी रेणुका प्रसूत झाली. त्याचेच नाव राम ठेवण्यात येते. तोच परशुराम!  परशुरामाचे दिसायला अत्यंत तेजस्वी होता. वयाच्या मानाने तो चांगला धिप्पाडही दिसत असे. चंचल प्रकृतीचा, एखाद्या गोष्टीसाठी हटट् धरला की तो पुरा झाल्याशिवाय स्वस्थ न बसणारा तो होता. दिवोदासची कन्या लोमहर्षिणीदेखील त्याच्याच वयाची असते. आश्रमातील सारी मुले एकत्र खेळतात. त्या मुलात लोमहर्षिणीदेखील सामील होत असे. परशुरामाला शस्त्रास्त्राचे शिक्षण देण्यावर जमदग्नीचा सहकारी कवी चयमान भर देतो. जमदग्नीला मात्र असे वाटत असे की परशुरामाला शस्त्रास्त्राच्या शिक्षणापेक्षाही शास्त्राचे, ईश्वरनिष्ठ ब्रह्मविद्येचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्यावरून जमदग्नीशी तीव्र मतभेद झाल्याने कवी चयमान आश्रम सोडून गावी निघून गेला. परशुराम त्याला परत आणण्यासाठी कोणालाही न सांगता निघून जातो. त्या प्रवासात परशुरामावर अनेक संकटे आली. तो दस्यूंच्या तावडीत सापडला. रात्रीच्या अधारात तो स्वतःची सुटका करून घेतली. पण त्यानंतर तो आणखी पणिच्या तावडीत सापडला मुलांना विकून द्रव्य कमावण्याचा पणिचा विचार असतो. त्यावेळी शुनःस्वेप नावाच्या मुलासही पणिने पळवून आणले होते. शुनःश्वेपला उपासनारहस्य जाणून घेण्यात रस होता. पण  तो पतित बापाचा मुलगा असल्याने उपासनेची संधी त्याला मिळणे शक्य नव्हते. म्हणून तो खिन्न होता. दोघांची एकमेकांशी ओळख होते. श्वेनःशुपला पतितमुक्त करण्याचे आश्वासन परशुरामाने त्याला दिले. दोघेही पणिच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी होतात. परशुरामाचेही लोपामुद्राप्रमाणेच असते. ज्याला गायत्री मान्य तो आर्यच. गायत्रीवर ज्याची नितांत श्रध्दा आहे तो आर्यच, मग तो जन्माने कोणी का असेना!
इकडे दिवोदासच्या राज्य दिवोदासपुत्र सुदास ह्याच्याकडे येते. विश्वरथाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सुदासच्या मनात मात्र खळबळ माजत असते. तृत्सूग्राम हीसुध्दा भरताची शाखा असल्यामुळे विश्वमित्राला सुदास हा मनोमन शत्रू समजून चालतो. परंतु राज्य संपादन करण्यात विश्वरथला अजिबात स्वारस्य नव्हते. ह्याही बाबतीत त्याने सवितृदेवतेचा कौल घेतला होता. त्याची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली की त्याचे नाव विश्वामित्र पडले. अवघ्या सप्तसिंधूत तो विश्वामित्र म्हणून ओळखला जाऊ लागला.
दरम्यान लोमहर्षिणीचा विवाह सहस्रार्जुनाशी करण्याचे सुदास योजतो. तिला मात्र सहस्रार्जुनाशी विवाह नको होता. सुदासच्या निमंत्रणालरून सहस्रार्जुन सप्तसिंधूत येतो. परंतु जमदग्नीशी आणि वसिष्ठशी उद्दामपणे बोलल्यामुळे त्याचे तृत्सूग्राममध्ये मनःपूर्वक स्वागत झाले नाही. त्यावेळी लोमहर्षिणीही आजोळी गेलेली असते. तिला पळवून नेण्याचा घाट सहस्रार्जुनाने घातला. त्यात तो यशस्वीही झाल. मात्र, त्यावेळी परशुरामही त्याच्या तावडीत सापडला. सगळ्या जणांना सहस्रार्जुन त्याच्या राज्यात घेऊन गेला.
इथून पुढे काळात परशुरामाच्या कार्यकर्तृतवाचा काळ सुरू होतो. सहस्रार्जुनाच्या राजप्रासादात जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न परशुराम करतो. परंतु तो ऐकण्याच्यापलीकडे गेलेला असतो. त्याला तो कैदेत टाकतो. त्याच्या कैदेतून परशुराम सुटून शेजारच्या दस्यू राज्यात जातो. दस्यूराज डड्डीनाथ ह्याला त्याने पित्यसमान मानले. पुढे तो त्याचा शिष्यही झाला. डड्डीनाथानेही त्याला अनेक प्रकारच्या सिध्दी दिल्या. तेथून परतल्यावर यादवांवर सहस्रार्जुनाकडून होणारा अन्याय दूर करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. अनुपदेश दुष्काळाने पीडित होता. परशुरमाच्या तपस्येने नदीला पाणी आले. जात्याच आळशी असलेले यादव खूश झाले. त्यांच्यातला आळस दूर करण्याचा आणि त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न करण्याचा प्रयत्न परशुरामाने सुरू केला. सह्स्राग्जुनाला हे समजते तेव्हा परशुरामाशी युध्द केल्याशिवाय अन्य उपाय नाही ह्या निष्कर्षावर तो आला. सहस्रार्जुनाशी युध्द करणे सोपे नाही ह्याची परशुरामालाही कल्पना असते. बरोबर सैन्य घेऊन तो लोमहर्षिणीसह (दरम्यान तो लोमहर्षिणीशी विवाहबध्द झाला.) सप्तसिंधूकडे जणयासाठी तो निघतो. परशुराम अर्थात त्याच्या मागावर गेला. पण त्याला थोडा विलंब झाला होता.  दोन्ही सैन्यात मात्र खूप अंतर राहिले. ह्यापुढच्या काळात परशुरामाच्या कर्तृत्वाचा दुसरा टप्पा सुरू होता. तो आपण उत्तरार्धात पाहू.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Wednesday, April 22, 2020

ऑनलाईन बिजिनेस? येस! व्हाय नॉट?

कोरोना संकटामुळे मुद्रण आणि इलेक्ट्रॉनिक माध्यामांच्या उत्पन्नात घट आली हे पाहून भारतातील प्रसारमध्यमे आपला व्यवसाय सावरण्याच्या प्रयत्नास लागले आहेत. व्यवसाय सावरण्याचा भाग म्हणून पत्रकार आणि बिगरपत्रकार कर्मचारीवर्गात कपात करण्याचे पाऊल काहींनी उचलले तर अन्य काहींनी तूर्तास पगारकपातीवर भागवण्याचे ठरवले. ह्याउलट फेसबुक आणि गूगल ह्या विदेशी माध्यम कंपन्यांना कोरोना संकट नसून सुसंधी वाटत असावी! फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड ह्या कंपन्यात ४३५७४ कोटींची गुंतवणूक केल्याची घोषणा फएसबुकने केली आहे. गूगलची घोषणा तर फेसबुकच्या घोषणेहून आणखी धमाल आहे! फेक न्यूजचा काटा मोडण्यासाठी गूगलने १० लाख डॉलर्सचा निधी उपलब्ध केला असून त्या निधीतून इंटरन्यूज नावाची ना नफा तत्त्वावर चालवली जाणारी कंपनी स्थापन केली जाणार आहे. भारतीय पत्रकारांना न्यूजसाक्षर करण्यासाठी न्यूजगॅदरिंग आणि न्यूज प्रोसेसिंग शिकवण्याचे उद्दिष्ट इंटरमन्यूजने समोर ठेवले आहे! ह्या प्रशिक्षण ( की नोकरी? )
ह्या दोन्ही बातम्यातील भाषा आकर्षक आहे. वाच्यार्थाने घ्यायीच की ख-या अर्थाने?  एकूण काय की सध्या तरी काहीच लक्षात येणार नाही. अधिक तपशीलाची वाट पाहिली पाहिजे. एकूण अमेरिकन बिझिनेसचा खाक्या लक्षात घेता दोन्हा कंपन्या भारतातल्या प्रसारमाध्यमांत आणि लहानमोठ्या व्यवसायात हातपाय पसरण्याच्या तयारीला लागल्या आहेत असा निष्कर्ष कढायला भरपूर वाव आहे. १९५० सालच्या सुमारास भारतात डलडा ब्रँडनावाचे वनस्पती ऑईल विक्रीला आले. वनस्पती ऑईल काय चीज आहे हे गरीब मधअयमवर्गिय लोकांना त्या काळात महित नव्हते. गावराणी तूप किंवा तेल हे दोनच पर्याय त्या काळात माहित होते. हळुहळू डालडाच्या रिकाम्या डब्यात तुळस लावण्यापर्यंत प्रगती देशात झाली!
मुकेश अंबानींच्या जिओमध्ये फेसबुकने केलेली ९.९९ टक्के गुंतवणूक ही आतापर्यंत एखाद्या भारतीय कंपनीत झालेल्या गुंतवणुकीत सर्वात मोठी गुंतवणूक आहे. देशभरातल्या लहानमोठ्या कंपन्यांना आवश्यक सॉफ्टवेअरसह स्वस्त दरात ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी मुकेश अंबानींनी जिओ प्लॅटफॉर्म कंपनी स्थापन केली. ह्या प्ल्रॅटफॉर्मार्फत लदानमोठ्या व्यपा-यांना स्वस्तात स्वस्त दराने ब्रॉडबँड सेवा पुरवण्याची योजना जिओने ह्यापूर्वीच जाहीर केली होती. वर्षाकाठी २० हजार रूपये किंमतीची ब्रॉडबँड सेवा अवघ्या दरमहा २००-२५० रूपये ( म्णजे वार्षिक २४०० रूपयात ) किंमतीत पुरवण्याचे रिलयन्सने जाहीर केले होते.
ह्यापूर्वीने केवळ डिपॉझिटच्या रकमेवर मोबाईल आणि सिमकार्ड देण्याचा उपक्रम रिलायन्सने केला होता. त्या उपक्रमाने व्होडाफोन आणि आयडियाचा धंदा बसला. स्पेक्ट्रमची फी भरण्याइतकेही उत्पन्न दोन्ही कंपन्या मिळवू शकल्या नाही. दोन्ही कंपन्यांची मिळून सरकारचे ५४ हजार कोटी रूपये थकबवले. थकबाकीचे हप्ते बांधूनही संपूर्ण देय रकम कंपनी सरकारला भऱू शकली नाही. थकबाकी कशी फेडायची चिंता कंपन्यांना अजूनही लागलेलीच आहे. लौकरच बाजारात ५ जी सेवा अवतरणार आहे. त्या सेवेला मागणी राहील हे उघड आहे. शेवटी फायदा रिलयान्सलाच! मोबाईल व्यवसायात उतरण्याचा प्रश्न आला त्यावेळी  आपल्या बड्या अधिका-यांशी चर्चा करताना धीरूभाई अंबानींनी असा प्रश्न केला, मोबाईल? येस! व्हाय नॉट? सामान्य माणसाकडे मोबाईल आलाच पाहिजे असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता.
आता सामान्य दुकानदराला, लहानफर्म्यलाही ऑनलाईन बिझिनेस करता आला पाहिजे ह्या दृष्टीने जिओ प्लॅटफॉर्म लि. कंपनी आकार घेत आहे. हया सेवेचा उपयोग करून पत्रकारांना वन मॅन न्यूज एजन्सी चालवता येईल. किंवा इ बुक कंपनीदेखील चालवता येईल. किराणा दुकान. भाज्या फळे, अनेक प्रकारचा माल ऑनलाईन मिळू लागला आहे. येणा-या काळाचा मंत्र काय असेल?
मला असे वाटते, ऑनलाईन बिझिनेस? येस! व्हय नॉट?
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Monday, April 20, 2020

दुजाभाव कां?

व्यक्ति किंवा व्यक्तींचा एखादा समूह सत्तांध झाला की सर्वात आधी काय होत असेल तर त्याची विवेकबुध्दी नष्ट होते. दुर्दैवाने राज्यात काही घटना अशा घडल्या की ज्याचे भांडवल करण्याची  संधी विरोधक आणि समाजकंटक सोडायला तयार नाहीत. कोरोना संकटाशी झुंजत आहे. अशी वेळी राज्यात झालेल्या दंगधोप्याच्या घटनांबद्दल सरकारला जबाबदार धरण्याचे विरोधकांचे छुपे प्रयत्न सुरू आहेत. एककीडे बांद्रा स्टेशनवर गर्दी जमवणा-या विनय दुबेला अटक करून कोर्टात उभे केले जात असताना दुसरीकडे उध्दव ठाकरे ह्यांना राज्यपालनियुक्त कोट्यातील आमदारकी बहाल करण्याच्या प्रस्तावाची कशी वासलात लावता येईल ह्याच्या योजना शिजत होत्या!  अर्थात त्यात विरोधकांना यश मिळेल की नाही ह्याबद्दल संशय आहे.
पालघर जिल्ह्यात झालेल्या तिघांच्या निर्घृण हत्त्येला धार्मिक रंग फासण्याचा प्रयत्न सुरू झाला. नेमके ह्याच वेळी महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची कारणे शोधण्यापेक्षा महाराष्ट्रात डॉक्टर्स, उच्च अधिकारी आधींचा समावेश असलेले एक पथक पाठवण्याचा विर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या कोरोना लढ्याला गालबोट लावण्याचा तर हा छुपा प्रयत्न नाही? वास्तविक केंद्राच्याही आधीपासून महाराष्ट्र सरकारने संचारबंदी कम् टाळेबंदी जाहीर केली. कोरोनाला रोखण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून विमानतळे बंद करण्याची सूचना केली. कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स आणि त्यांच्या सहायकांना पीपीइ किट पुरवण्याचे केंद्राचे काम काहीशा मंद गतीने सुरू होते. त्याचा फटका जास्तीत जास्त महाराष्ट्राला बसला. परंतु ते लक्षात घ्यायला केंद्र सरकार तयार नाही.
वास्तविक मुंबई, पुणे, ठाणे-कल्याण, भिवंडी, पनवेल, नागपूर, औरंगाबाद ह्यासारखी ही गर्दीची आणि दाट लोकवस्तीचीही शहरे महराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातला कोरोना संसर्ग वाढल्याचे चित्र दिसते. मुळात ह्या शहरातील बहुसंख्य नागरिक छोट्या घरात राहतात. कोरोनापासून वाचवण्याइतपत सुरक्षित अंतर राखणेही त्यांना घरातल्या घरात  शक्य नाही. निम्मे शहर हे सारे जीवनव्यवहार नुक्कडवर उरकत असते. हे केंद्र सरकार लक्षात घ्यायला तयार आहे की नाही? शेजारच्या कर्नाटक राज्यात पुढा-यांचे लग्न सोहोळे सुरू आहेत. गुजरात राज्यातील सुरत शहरातील मजूर गावी निघण्यासाठी झुंडीने निघत असल्याचे व्हिडिओ चित्रवाहिन्यांवर दाखवण्यात आले. दोन्ही राज्यातील सरकारे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकार काय करत आहे हे पाहण्यासाठी तेथे केंदरीय पथक पाठवण्याचा विचारही केंद्राला सुचला नाही. दोन्ही राज्ये भाजपाशासित आहेत म्हणून? केरळ आणि गोवा राज्याने करोनाचा यशस्वी मुकाबला केला. परंतु त्यांच्याबद्दल कौतुकाचे दोन शब्द केंद्र सरकार बोलले नाही.
उत्तरप्रदेश सरकारने करोना घालवण्यासाठी काय केले, ह्याचा शोध घेण्याऐवजी केंद्र पश्चिम बंगालचीच अधिक चिंताकरत बसले आहे!  मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान ह्यांचा लगबगीने शपथविधी उरकण्याचा उत्साह दाखवणारे केंद्र सरकार इंदौर शहरात करोनाचा कहर सुरू झाल्याचे दिसत असूनही इंदौर वाचवण्यासाठी कोणती पावले टाकली असा साधा प्रश्न मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहांनाना विचारावासा केंद्र सरकारला वाटला नाही!
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. इथले अर्थचक्र सुरू झाल्याखेरीज देशाचे अर्थचक्र सुरू होणार नाही. जवाहरलाल नेहरू पोर्टकडे जाणारी आणि तेथून बाहेर पडणारी वाहतूक लौकरात लौकर सुरू करण्यासाठी मदत हवी का, असे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला विचारल्याचे ऐकिवात नाही. तेच मुंबईच्या बाबतही आहे. संचारबंदी थोडी शिथील होताच कसोशीने कार्यसंस्कृती जपणारी बिच्चारी मुंबईची जनता लगेच रस्त्यावर आली !  काम करण्यासाठी आपण सिध्द आहोत हेच त्यांनी दाखवून दिले. मुंबईतल्या वाहनांच्या गर्दीचे चित्र छापून आलेले वर्तमानपत्र हातात फडकावून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जाऊ शकतो!
कोरोनाशी लढतानाच्या ह्या असामान्य परिस्थितीत निरनिराळ्या राज्यांशी वागताना केंद्र सरकार दूजा भाव करणार नाही एवढीच अपेक्षा! हातातोंडाशी आलेली सत्ता गमावून बसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांचा एखादे वेळी संयम आणि विवेक युटला तर सुटू द्या! परंतु कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या सत्तेवर असलेल्या नेत्यांनी संयम आणि विवेक सोडू नये. तसा तो सुटणार नाही ह्याची राज्यातील जनतेला निःसंशय खात्री आहे.
तरीही, एकच इशारा द्यावासा वाटतो, रात्रच नव्हे तर दिवसही वै-याचे आहेत !
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

महाभारतातले राजकारण

जगात आतापर्यंत झालेल्या अनेक महायुध्दांमागे कारणांची शंखला आहे. तशी ती इसवी सनपूर्व ३१४० च्या आसपास भारतात कुरूक्षेत्रावर झालेल्या महाभारत युध्दामागेही आहे. महाभारतात युध्दही आहे. युध्दस्य कथा रम्या ह्या उक्तीनुसार महाभारताची कथाही रम्य आहे. म्हणूनच सध्याच्या नाटक-चित्रपटांच्या आणि टीव्ही चॅनेल ह्यासारख्या दृक्श्राव्य माध्यमांनाही महाभारताचे आकर्षण वाटते. आपापल्या तंत्रानुसार महाभारत युध्दाचा इतिहास प्रत्येक कलामाध्यमाने उलगडला. कुणी व्यक्तिविशेषांच्या पैलूंवर नवा नवा प्रकाशझोत टाकला तर कुणी प्रतिभा, प्रज्ञा धृति ह्या वेगवेगळ्या अंगाने महाभारताचा एखादा कथाभाग किंवा संपूर्ण महाभारताचे नवसृजन केले. देशविदेशातील लाखो श्रोत्यांना, प्रेक्षकांना आणि वाचकांना महाभारताने मंत्रमुग्ध करून सोडले. मंत्रमुग्ध करून सोडण्याचे सामर्थ्य महाभारतात आहे. सध्या सुरू असलेल्या महाभारतावरील प्रदीर्घ मालिकेने ते पुन्हा एकदा दाखवून दिले.
राजसिंहासनावर अधिकार कोणाचा ह्यावरून महाभारत युध्द उद्भवले हे खरे आहे. अर्थात् युध्दविषयक कारणासंबंधीच्या प्रश्नाचे ते फारच ढोबळ उत्तर झाले. १८ दिवस चाललेल्या ह्या युध्दात १८ अक्षौणी सैन्य ठार झाले. ५ पांडव, कृष्ण, सात्यकी आणि अश्वत्थामा हे ८ जण वगळता ह्या युध्दात भाग घेतेलेले सारे राजे मारले गेले. महाभारताच्या अंगोपगांचे दर्शन घडवण्यात आणण्यात अनेकांनी केले तरी महाभारतातल्या राजकारणाचे तपशीलवार दर्शन मात्र कमी लेखकांनी घडवले आहे. 
महाभारताच्या राजकारणाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा महाभारत काळी द्युत खेळणे सिंहासनाधिष्ठित राजे लोकात पूर्णपणे शिष्टसंमत मानले जात होतेहे लक्षात ठेवले पाहिजे. अटीतटीच्या द्युताची प्रतिक्रिया पुन्हा काही काळानंतर पुन्हा द्युत खेळून व्यक्त होत असे. किंवा युध्दानेही ह्या प्रतिक्रियेला पूर्णविराम मिळत असे. नलदमयंती आख्यानात नलाने बंधूबरोबर पुन्हा द्यूत खेळून हरलेले राज्य पुन्हा जिंकल्याचे उदाहरण महाभारतातच आले आहे. द्यूतात विजयी झाला म्हणून नलराजा पुन्हा राजसिंहासनावर बसला. कौरव दरबारात झालेल्या द्युतात पांडव राज्य गमावून बसले. द्रौपदीचा विटंबना झाली.
हे द्यूत खेळू दिली ह्यात आपले काही तरी चुकले अशी जाणीव सिंहासनाधिष्ठित महाराज धृतराष्ट्राला झाली. पण त्याला फार उशीरा झाला. आधी खेळलेले सर्व डाव रद्द करून त्याने परत गेलेल्या पांडवाना पुन्हा एकच डाव खेळायला या असा निरोप पाठवला. नंतरच्या डावात पांडव पुन्हा एकदा हरले! दुर्दैवाने राज्य परत मिळवण्याऐवजी १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास पत्करण्याची पाळी पांडवांवर आली.
बी. आर. चोपडांच्या महाभारतात विदूर आणि भीष्म ह्यांनी उठून द्यूत थांबवण्याची मागणी केल्याचे दाखवले आहे. त्यात नाट्य आणण्यासाठी चोपडांनी युधिष्ठिराचा यथेच्छ उपाहास करणारे संवादही शकुनीच्या तोंडी टाकले. त्यामुळे महाभारताची रंगत निश्चितपणे वाढली. अनेक लेखकांप्रमाणे चोपडांनीही महाभारत तयार करताना कला आविष्काराचे स्वातंत्र्य भरपूर उपभोगले. परंतु द्यूत क्रिडेमागचे भडक राजकारण चोपडांनी बरोबर दाखवले. द्यूतास घेण्यात आलेला आक्षेप मात्र एकदाच घेण्यात आलेला दाखवला. युधिष्ठिरमहाराज स्वतः हरलेले असताना मला पणास लावण्याचा त्यांना अधिकारच कसा पोहचतो असा आक्षेप दौपदीने घेतला. तो बरोबरही आहे.  
वास्तविक कौरव दरबारात झालेल्या द्युतात द्यूतविषयक सर्व संकेतांना फाटा देण्यात आला होता. ज्याच्याशी द्यूत खेळायचे त्याच्या दरबारात द्यूत खेळू इच्छिणा-याने हजर व्हायला पाहिजे असा संकेत आहे. हा संकेत कुरू दरबारात झालेल्या द्युतात पाळला गेला नाही. पांडवांचा आदर सत्कार करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. दरबारात त्याप्रसंगी मनोरंजनासाठी द्यूत वगैरेही खेळले जाईल, असा निरोप पांडवांना देण्यासाठी धृतराष्ट्राने मुद्दाम महामंत्री विदुराची निवड केला. विदुराला धृतराष्ट्राने इंद्रप्रस्थला पाठवले होते. युधिष्ठिर हा इंद्रप्रस्थ राज्याचा सिंहासनाधिष्ठित राजा होता. द्यूत हे समसमान राजाशी खेळायचे असते ह्या तत्त्वानुसार युवराज दुर्योधनाशी द्यूत खेळायला त्याने नकार द्यायला हवा होता. यूत खेळायचेच होते तर त्याने ते फक्त धृतराष्ट्राशीच खेळायला हवे होते. युवराज दुर्योधनाशी नाही. हा द्युतसंबंधीच्या तत्कालीन संकेतांचा उघड उघड भंग होता.
द्युतात हरलेल्या संपत्तीवर कोणाचाच अधिकार असत नाही. त्यानंतर द्रौपदीची भर दरबारात विटंबना झालेली, इंद्रप्रस्थाचे राज्य डावात हरल्याने वनवास आणि अज्ञातवास पत्करण्याची पाळी पांडवावर आली हे पाहून, खरे तर, धृतराष्ट्र मनातल्या मनात पार हादरून गेला. पांडव राजसभेतून निघून गेल्यावर उशिरा का होईना द्युताचे हे डाव रद्दबातल ठरवण्याची बुध्दी धृतराष्ट्राला झाली.  आधी खेळले गेलेले डाव त्याने रद्द केले. युधिष्ठिराला पुन्हा एक डाव खेळण्याची संधी मिळावी म्हणून त्यांना परत बोलावण्याचा हुकूम धृतराष्ट्राने दिला. विशेष म्हणजे काकांची आज्ञा मान्य करून युधिष्ठिर बंधूंसह दरबारात पुन्हा हजर झाला.
द्यूत खेळले जात असताना कौरव दरबारात द्युताचे ५ जाणकार हजर होते. परंतु पाची जणांनी  झालेल्या द्युताबद्दल अवाक्षरही काढले नाही! म्हणजे दरबारातले द्यूत दबावाखाली झाले. म्हणूनच ते द्यूत कपट द्यूत म्हणून ओळखले गेले! ह्या द्युताची हकिगत श्रीकृष्णाला जेव्हा समजली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, मी तेथे उपस्थित असतो तर हे द्यूत जबरदस्तीने थांबवले असते. तशा आशयाचे श्लोक महाभारतात आले आहेत. सर्वस्वान्तकारक द्युतात युधिष्ठिर सुरूवातीला १८ डाव हरला. १९ व्या डावात त्याने स्वतःला सावधपणे पणाला लावले.  कदाचित्  द्युताचा शेवट अटळपणे युध्दात होणार ह्याची कल्पना युधिष्ठिरला आली असावी! स्वतः हरल्यावर चारी भावांना पणाला लावण्याचा त्याला अधिकार नाही हे युधिष्ठिरच्या लक्षात आले नसेल असे नाही. परंतु सात्विक अहंकाराच्या आहारी गेल्याने युधिष्ठिरला सत्य उमगले नाही असे म्हणता येईल. शकुनीच्या सुचनेनुसार त्याने द्रौपदीलाही पणाला लावले! दौपदीला दरबारात आणण्यासाठी सेवकाला पाठवले तेव्हा मला पणास लावण्याचा युधिष्ठिरला अधिकार नाही; कारण तो स्वतःच हरलेला आहे असा मुद्दा द्रौपदीने उपस्थित केला!  त्याखेरीज युधिष्ठिर स्वतः द्युतात हरल्याने पत्नी ह्या नात्याने द्रौपदी आपोआपच दासी झाली होती. ती दासी झाली तरी युधिष्ठिराची पत्नी ह्या नात्याने तिचे स्वतंत्र स्थान अबाधित राहिले असते. पतीविना ती आयुष्य सहज जगू शकली असती.  
कौरव दरबारात हा अनर्थ घडत असताना भीष्मपितामह गप्प का बसले हा प्रश्न आजच्या काळातले विद्वान विचारतात. परंतु प्रतिज्ञाबध्द असल्याने राजदरबारातल्या कुठल्याही बाबीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार भीष्मपितामहांनी स्वतःहून सोडला होता. द्रोणाचार्य तर स्वतःला भीष्माचा अंकित समजत असल्याने दरबाराच्या कामकाजात भाग घेण्याचा त्यांना मुळातच अधिकारच नव्हता. दरबारात घडणा-या घटनांची दखल कृपाचार्यांनी घेतली नाही असा आक्षेप घेतला गेला. तोही अधिकारहीनच होता. 
दरबारी चालीरीतींच्या अनभिज्ञतेमुळे सृजनशील द्यूत क्रीडेचा अर्थ लावताना कीर्तनकार, कवी, कथेकरी बुवा ह्या सगळ्यांनी राजकीय मुद्द्यांकडे अजिबात लक्ष दिले नाही. अर्थात तसे ते देण्याचे त्यांना कारणही नाही. मानवी स्वभावाच्या विविध पैलेच मनोज्ञ दर्शन घडवणे हाच त्यांचा प्रांत! प्रसंग रसभरित वाणी-लेखणीने रंगवून जिवंत प्रसंगचित्र उभे करणे हेच त्यांच्या प्रतिभेचे सारगर्भ सामर्थ्य. युध्द का अपरिहार्य ठरले ह्याची मीमांसा त्यांच्याकडून अपेक्षित नाही. कृष्णशिष्टाईचा प्रसंग वगळला तर द्यूत, धृतराष्ट्राचा दूत ह्या नात्याने संजय आणि दुर्योधनाचा दूत म्हणून उलूक ने बजावलेली कामगिरी इत्यादींकडे लेखक-कलावंतांनी गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही.
रमेश झवर
( भग्वद्गितेचे लक्ष् कोण ह्या द. ल. शिवलकरलिखित पुस्तिकेवर हा लेख आधआरित आहे. )

Saturday, April 18, 2020

रिझर्व्ह बँकेचे पॅकेज

रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात आणि बिगरबॅंकिंग फायनान्स कंपन्यांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला ५० हजार कोटी रुपयांचा निधी ही रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या वित्तीय धोरणाची दोन नेहमीची वैशिष्ट्ये आहेत. नेहमीची वैशिष्ट्ये म्हणण्याचे कारण जास्त पैसा जास्त ओतला की लगेच उद्योग धंदे धूमधडाक्याने चालू लागतील अशी रिझर्व्ह बँकेची परंपरागत समजूत आहे. चालू कारखाने दिवाळखोरीत निघू नयेत एवढेच मर्यादित ध्येय रिझर्व्ह बँकेने डोळ्यांसमोर ठेवलेले दिसते. पुरेशा वित्तपुरवठ्याचा अभाव हे दिवाळखोरीचे एकमेव कारण कधीच असत नाही. गैरव्यवस्थापन, उत्पादनाचे जुनाट तंत्र, ढिसाळ विक्री व्यवस्था ह्यासाऱखी  अनेक कारणे एखादा उद्योग दिवाळखोरीत जाण्यास कारणीभूत ठरतात.
स्वस्त कर्जाचे भरघोस पॅकेज दिले की काम झाले असा सोपा समज रिझर्व्ह बँकेने करून घेतला आहे. तरीही प्रत्यक्षात पॅकेजचे व्यहारात कितपत प्रतिबिंब पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या परिस्थिती कोरोना प्रभाव-प्रसाराचा रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पॅकेजची कितपत मदत होईल हेदेखील पाहावेच लागणार आहे! कार आणि घरांसाठी कर्ज स्वस्त करण्यात आल्याचे  तुणतुणे रिझर्व्ह बँकेने ह्यापूर्वी अनेक वेळा वाजवले. ह्याही वेळी ते तुणतुणे वाजवण्यात आले. कार आणि घर ह्या मध्यमवर्गियांच्या अत्यावश्य गरजा आहेत हे मान्य केले तरी कमर्शियल आणि मालवाहू वाहने तसेच इंधन खरेदीवर बॅंकेकडून कर्जसवलती कधी दिल्या गेल्या? त्या का दिल्या गेल्या नाही? कंपनीच्या सॅलरी बिलासाठी बँकेकडून अत्यल्प दराने स्वतंत्र कर्ज का उपलब्ध करून देण्यात आले नाही? कंपनी कामगारांची सॅलरी खाती सुरू करण्यास उत्तेजन दिले पाहिजे. देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. ती कशी कमी करता येईल ह्यासाठी रिझर्व्ह बँकेला काहीच उपाययोजना करता येणारच नाही असे नाही. लेबरबिलावर शून्य टक्के दराने कर्ज दिले तरी ते समर्थनीय ठरावे.
जीवनोपयोगी माल आणि नित्योपयोगी जिनसा उपलब्ध करून देणा-या व्यवसायिकांना जास्तीत जास्त पैसा उपलब्ध कसा करून देता येईल ह्यावर उपाय शोधणे रिझर्व बँकेला फारसे अवघड नाही. पण ह्या विषयाचा विचार करण्यास रिझर्व्ह बँक अजूनही तयार नाही. कदाचित हे काम सरकारचे आहे, आपले नाही अशी समजूत रिझर्व्ह बँकेने करून घेतलेली असावी. अर्थव्यवस्था आणि वित्तीय व्यवस्था ह्या दोन व्यवस्था भिन्न आहेत हे मान्य, परंतु प्रत्यक्षात दोन्ही व्यवस्थातील फरक अतिशय झिरझिरीत आहे. कोणत्या व्यवसायाला कर्जवितरणास अग्रक्रम द्यावा कोणत्या व्यवसायाला नको हे नव्या परिस्थितीत रिझर्व बँकेने अवश्य ठरवले पाहिजे. एकेकाळी बँक धोरणात प्रॉयारिटी सेक्टर अग्रक्रमता हा परवलीचा शब्द होता. आजघडीला  प्रॉयारिटी सेक्टर नव्याने ठरवण्याची गरज आहे. बँकांचा पैसा उद्योगनिहाय उपलब्ध करून देण्याचे नवे धोरण रिझर्व्ह बँकेला जाहीर करताआले असते. दुर्दैवाने रिझर्व्ह बँक अजूनही चाकोरीबध्द विचारातून बाहेर पडायला तयार नाही.
अलीकडच्या काळात वाहतूक व्यवसायात विम्याचे वाढते प्रिमियम, इंधन दरात अकारण वाढ, ट्रकचालकांचे वाढीव पगार-भत्ते ह्या समस्यांनी आक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे. वाहतूक व्यवसायाच्या विशिष्ट समस्यांना तोंड देण्यासाठी मंजूर फायनान्सच्या दुप्पट फायनान्स टेंपररी ओडी स्वरूपात मंजूर करण्याच्या सूचना बँकांना दिल्या तरच वाहतूक व्यवसायाचे चक्र सुरळितपणा धावू लागेल. खासगी मालवाहतुकीबरोबर राज्य प्रवासी वाहतूक महामंडळे, रेल्वे इत्यादींना इंधनखरेदीसाठी टेंपररी ओव्हड्राफ्ट उपलब्ध करून देण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिला तर व्यवसाय आणि रोजगारात वृध्दी होऊ शकते. जाचक इंधन दर हा स्वतंत्र विषय असून त्यावर विचार करण्याची जबाबदारी सरकारची आहे, बँकांची नाही.  
कोणताही देश हा लहानमोठे व्यापारी, दुकानदार, वाहतूकदार, शेतकरी शेतीशी संबंधित खत-बीबियाण्यांच्या व्यवसायावर चालतो. उद्योगाच्या तुलनेने समाजाचे हे मोठे चक्र आहे. ते सर्वप्रथम फिरले पाहिजे तरच उद्योगाचे चक्र गतिमान होईल, अन्यथा नाही. थोडक्यात, व्याजदरात कपात आणि लघु आणि मध्यम उद्योगांना जास्त कर्जाचे पॅकेज ह्या चाकोरीबध्द धोरणाचा रिझर्व्ह बँकेने फेरविचार केला पाहिजे.
रमेश झवर  
ज्येष्ठ पत्रकार

Thursday, April 16, 2020

हा तर देशद्रोहाचा गुन्हा


एक माणूस उठतो आणि सरळ लोकांना बांद्रा स्टेशनवर जमा होण्याचे आवाहन करतो! लोकही मेंढरासारखे त्याच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देतात. म्हणता म्हणता हजारो माणसे तेथे जमतात. ह्या सगळ्या लोकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी हर प्रकारे मदत करण्याचे आश्वासन त्या माणसाने दिलेले असते.   वास्तविक त्याच दिवशी संचारबंदी आणि लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केलेली असते. पंतप्रधानांच्या घोषणेच्या थोडे आधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी कम् टाळेबंदी वाढवण्याची घोषणा केलेली असते. तरीही बांद्र्यात जमाव एकत्र आलेलाच असतो. शेवटी जमावाला पिटाळून लावण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. हे सगळे ठरवून घडवून आणले जात असेल तर त्यामागे योजनाबध्द कट असल्याचा निष्कर्ष नाइलाजाने काढावा लागेल. जमावाला पिटाळून लावण्यात जरी पोलिस यशस्वी झाले असले तरी ज्यासाठी जमावबंदी, संचारबंदी किंवा टाळेबंदी जारी करावी लागली त्या कोरोनाचा फैलाव होण्यास ही घटना कारणीभूत ठरणारच नाही हे निश्चितपणे कसे सांगता येईल?
अर्थात बेरोजगार झालेले लाखो मजूर निराश झालेले आहेत. त्यांना रोजगार तर नाही. खायला अन्न मिळवण्याची मारामार. त्यांना पगार द्या असे आवाहन सरकारकडून करण्यात आले असले तरी फुकट खाण्याची अनेकांची नियत नसते असा अनुभव आहे. हे लोक फआरसे शिकलेले नाही हे खरे; पण अडाणीही नाहीत. त्यामुळे ह्यांना कोणी झुलवले असेल आण तेही झुलले असतील तर त्यात त्यांची फार मोठी चूक झाली असे म्हणता येणार नाही. उलट संचारबंदी कम् टाळेबंदीचे उल्लंघन करून त्यांना एकत्र जमण्याचे आवाहन करणारा मात्र अट्टल गुन्हेगार आहे.    
हजारो लोकांना झुलवणारा कोण आहे हा उपदव्यापी इसम?  विनय दुबे नामक ह्या इसमाने कल्याण मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्याविरूध्द निवडणूक लढवली होती. त्यापूर्वीही उत्तरप्रदेशातही म्हणे त्याने विधानसभेची निवडणूक लढवली होती. तो मुंबईत केव्हा आला? नवी मुंबईत तो वास्तव्यास केव्हा गेला? तो नेमका काय उद्योग करतो? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढणे पोलिसांना मुळीच अवघड नाही. पोलिसांना आतापर्यंत समजलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून हा स्वयंघोषित पुढारी समाजमाध्यमातून लोकांना त्यांच्या मूळ गावी पोहचता यावे म्हणून आंदोलन सुरू करण्याची भाषा करत होता. १८ एप्रिलपर्यंत उत्तरप्रदेशातल्या मजुरांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था सरकारने केली नाही तर देशव्यापी आंदोलन छेडण्याचे त्याने जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागचापुढचा विचार न करता लॉक़डाऊनची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला असाही आरोप त्याने केला. १४ तारखेला गाड्या सुरू करण्याचीही मागणी त्याने केली होती.
जमावाला पिटाळून लावण्याची पोलिस कारवाई लगेच सुरू झाली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बांद्राच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्याशी बोलणे केले होते. त्यांचे काय बोलणे झाले हे कळण्यास मार्ग नाही. परंतु गावी परत जाणा-यांचा अशाच प्रकारचा जमाव सुरत येथेही जमल्याचा व्हिडिओ एबी माझाने प्रदर्शित केला. लॉकडाऊननंतर देशातल्या अन्य भागातही पोलिस विरूध्द जमाव अशा चकमकी उडाल्याची दृश्ये पाहायला मिळाली. पोलिसांवर हल्ला होण्याची प्रकरणे तर फारच गंभीर आहेत. ह्या सगळ्याचा अर्थ देशभरात समाजविघातक शक्ती सरकारविरूध्द कंबर कसून उभ्या राहिल्या आहेत असा होतो.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार ह्यांच्यासह अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना पाठिंबा दिला आहे. मिडिया आणि स्वतंत्रपणे ब्लॉगसाईट, यू ट्यूब किंवा इन्स्टाग्रामवर कार्यरत असलेल्या सगळ्या मिडियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीप्रमाणे विरोध न करता एकमुखी पाठिंबा दिला आहे. विवेकबुध्दी आणि संयमाला फाटा दिल्याचे एकही उदाहरण नाही. कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका समोर दिसत असताना जनतेचा बुध्दिभेद करणे गैर ठरते ह्याद्दल मिडियाचे मतैक्य आहे. गेल्या तीनचार दिवसात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोना मृत्यूची संख्या वाढत असली तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव साथ म्हणवण्याइतपत झालेला नाही ह्या आरोग्य यंत्रणेच्या मताशी मिडियाने असहमती दर्शवल्याचे दिसत नाही. तपासणी किटची टंचाई किंवा औषध पुरवठ्याच्या अडचणी ह्याबद्दल मिडियाने सरकारला किंवा संबंधित यंत्रणेला मुळीच धारेवर धरले नाही. मिडियाकडून अजून तरी अभूतपूर्व संयम पाळला जात आहे हे सुदैव!
कोरोना संकटाशी देश सामान करत असतानाच्या काळात एखाद दुसरा विनय दुबे निघाला हे खरे, परंतु त्याला पोलिसांनी लगेच अटक केली हेही महत्त्वाचे आहे. विनय दुबेला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्याचा गुन्हा साधा नाही. त्याने केलेला गुन्हा हा ख-या अर्थाने देशद्रोहाचा गुन्हा म्हणावा लागेल. पोलिस तपासाला ७ दिवसांचा अवधी पुरेसा ठरावा अशी अपेक्षा आहे. मात्र ह्य खटल्याची त्वरेने सुनावणी होऊन त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळाली तर पोलिस आणि सामान्य जनतेचे मनोधैर्य उंचावण्यास निश्चितपणे मदत होईल. विनय दुबे ही राजकारणात शिरू इच्छिणारी उटपटांग प्रवृती आहे. ती वेळीच ठेचली पाहिजे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार