Sunday, May 22, 2022

पवारांचे खडे बोल

स्वपक्षियांना जातीविरोधी  वक्तव्ये  करण्याचा जाहीर सल्ला देऊन ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ब्राह्मणांची मने जिंकली की नाही हे कळण्यास मार्ग नाहीसेवा आणि नोकरीच्या क्षेत्रात ब्राह्मणनर्ग बहुसंख्येने आहेपण म्हणून त्यांची आरक्षणाची मागणी मान्य करता येणार नाही हेही पवारांनी ब्राह्मणवर्गाच्या निदर्शनास आणून दिलेत्याचवेळी कोणालाच आरक्षण नको की ब्राह्मण महामंडळाच्या मागणी मात्र त्यांनी बैठकीतच फेटाळून लावली.  सामान्यतराजकारणी मंडळी ह्या प्रश्नावर गुळमुळीत बोलून वेळ मारून नेतातपवारांनी मात्र तसे केले नाही. ब्राह्मणांच्या प्रश्नावर पवारांची घेतलेल्या भूमिकेने त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची झलक महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

ब्राह्मणवर्ग देशभरात पसरलेल्या आहे. तरीही प्रत्येक प्रांतातल्या ब्राह्मणवर्गाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेतस्थूल मानाने असे म्हणता येईल की ब्राह्मणवर्गदेखील जातीपोटजातीत विभागला गेलाप्रत्येक पोटजातीचे हितसंबंध वेगवेगळे आहेत हे ओघाने आलेचपूर्वीच्या काळी ब्राह्मणवर्ग हा पंचगौड आणि पंचद्रविड ह्या दोन प्रमुख वर्गात विभागलेला होतादोन वर्गात विभागलेला ब्राह्मणवर्ग प्रांतपरत्वे हळुहळू आणखी वेगवेगळ्या पोटजातीत विभागला गेलागेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात समस्त ब्राह्मणवर्गाची एकजूट घडवून आणण्याचे प्रयत्न यशस्वी झालेब्राह्मण महामंडळ हे त्याचेच फळ आहेपूर्वीच्या मुंबई प्रांतात थेट कराचीपासून कर्नाटकापर्यंत सुमारे  हजार जातींची नोंद करण्यात आली आहे. त्याखेरीज लग्नकार्यासाठी बहुतेक जातींनी त्यांच्यातल्याच एका ज्ञानी माणसाला ब्राह्मणाचा मान देण्याची प्रथाही सुरू केली.  ह्याचा अर्थ ज्ञानार्जन करणा-या सर्वांनाच ब्राह्मणाइतकाच मान मिळतो!  

मुळात वैदिक संस्कृतीत आर्य टोळ्यांतील ज्यांनी स्वकियांच्या रक्षणाची जाबबादारी पत्करली ते आपोआपच क्षत्रिय ठरलेज्यांनी तपश्चर्या करून  ज्ञानमार्गा वाटचाल केली ते आपोआपच ऋषी झालेऋषींवर्गातही मतभेद होतेच. विशेषतः लोपामुद्राने तिचा स्वतंत्र आश्रम स्थापन केला होता. अनेक ऋषींशी तिचे मतभेद होते. दस्यू सरसकट खलप्रवृत्तीचे नाहीत असे तिचे मत होते.

 विशेषतः द्रविडांशी कशा प्रकारचे संबंध ठेवावेत ह्यावरून त्यांच्यात मतभेद होतेभृगू कुळातले ऋषी हे लढवय्येही होतेशरादपि शापादपि’ असा त्यांचा बाणा होता. आर्यांना मान्य असलेल्या शाश्वत जीवनमूल्यांचे जो पालन करतो तोकृष्णवर्णीय द्रविड का असेना. तो खराखुरा आर्य अशी परशुरामाची भूमिका होती. आर्यांची जीवनमूल्ये फारशी न पाळणा-या सह्स्रार्जुनाने परशुरामला कैद करून  नर्मदेपलीकडे असलेल्या त्यांच्या राज्यात आणले होतेपुढे परशुरामाने स्वतःची सुटका करून घेतलीसुरूवातीला भार्गवरामाचे वास्तव्य अनुप देशात म्हणजे आताचे गुजरात ) होतेतो थेट  कोकणातील चिपळऊण पर्यंत आला होता चिपळूण – गुहागर परिसरात उभारण्यात आलेले परशुरामाचे देऊळ आजही दिमाखाने उभे आहेपश्चिम रेल्वेवरील भडोचचे मूळ नाव भृगूकृच्छवरून पडले असावे. अनेकांनी ऋग्वेदकालीन इतिहासाचे संशोधन केले. ह्या बाबातीत पाश्चात्य विद्वानांनी जितका पुढाकार घेतला तिकाच पुढाकार मराठी विद्वान संशोधकांनीही घेतलात्यांच्या  संशोधनाविषयी आताच्या पिढीला पारशी माहिती नाही. यज्ञयागाचे कर्मकांड सुरू झाल्यानंतरच्या काळात ब्राह्मणांना अधिक मानाचे स्थान प्राप्त झाले. असो.

शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेतब्राह्मण महामंडळाच्या वतीने आयोजि करण्या आलेल्या बैठकीचा त्यांनी अचूक फायदा घेतला. त्या निमित्ताने स्वपक्षातल्या काही नेत्यांना जाहीररीत्या खडे बोल सुनावण्यास  त्यांनी कमी केले नाही!

रमेश झवर



No comments: