वायूसैनिकांनो, देश तुमच्या पाठीशी आहे! पाकव्याप्त
काश्मिरमधली पूछजवळील बाराकोट आणि चकोटी ठिकाणी सुरू असलेली जैश ए मोम्मद आणि
लष्करे तोयबाची अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे वायुदलाच्या 12 विमानांनी सुमारे 100
बाँब टाकून नष्ट केली. वायूदलाची कारवाई निव्वळ पुलवामाचा बदलाच नाही. अतिरेकी
कारवाया थांबवा अन्यथा त्या कारवाया थांबवायला भारतीय लष्कर समर्थ आहे हा भारताचा
इशाराही आहे. अमेरिका, चीन हे देश पाकिस्तानला चार समजुतीच्या गोष्टी सांगायला तयार असले
तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही असे देशाला वाटते. वायूदलाच्या कारवाईने
देशाच्या ह्या भावनाही जगाला दाखवून दिल्या. हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले, पाकिस्तानचे किती नुकसान झाले हे
माझ्या मते, महत्त्वाचे
नाहीच. महत्त्वाचे काय असेल तर हेच की पाकिस्तानला जरब बसवणे! वायूदलाने ती बसवली
आहे.
रमेश झवरrameshzawar.com

No comments:
Post a Comment