स्मारक कुणाचेही असो, ते कुठे करा, कुठे करू नका ह्यावर चर्चा सुरू केल्याखेरीज आपली हुषारी लोकांना कशी दिसणार? आपली असलेली अन् नसलेली अक्कल पाजळली नाही तर आपले मह्त्त्व कसे वाढणार ह्या विचाराने झपाटलेल्यांचा भरणा राजकारण आणि समाजकारणात वाढत आहे. लता मंगेशकरांच्या मृत्यूला २४ तास उलटले नाही तोच भाजपा आमदार राम कदम ह्यांनी लता मंगेशकरांच्या निवासस्थानी जाऊऩ लतादीदींचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर भेट घेतली आणि लतादीदींचे स्मारक करण्याचा मुद्दा उपस्थित केला. साहजिकच काँग्रेस नेते, शिवसेना नेते संजय राऊत ह्यांना त्या विषयावर बोलणे भाग पडले. वास्तविक ठाकरे सरकार ह्यावर आपणहून घोषणा करणार हे स्पष्ट होते. राम कदम हे संगीतकार आहेत. ते आमदार
त्याआधीच राम कदम ह्यांनी विषय छेडून
मोकळे झाले. वास्तविक विरोधी नेते देवेंद्र फडणवीस हे भाजपा नेते
विरोधी पक्षनेते आहेत. स्मारकासंबंधी मुख्यमंत्र्यांशी
चर्चा-विचारविनिमय करण्याचे कर्तव्य फडणविसांनी निश्चितपणे बजावले असते. परंतु आपल्याच नेत्यांसह
मुख्यमंत्र्यांवरही कुरघोडी
करण्याच्या नादात राम कदम लतादीदींच्या निवासस्थानी गेले आणि स्मारकाची चर्चा
सुरू केली. ह्याला गावठी भाषेत ‘आगाऊपणा ‘ म्हणतात
!
वास्तविक लतादीदींचे स्मारक
करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यापूर्वी संबंधितांशी
चर्चा, विचारविनिमय करण्याची भूमिका मुख्यमंत्री ठाकरे ह्यांनी ठरवलेले असू शकते. असो.
ह्या विषयावर तूर्त तरी चर्चा करण्याचे कारण
नाही.
रमेश झवर
No comments:
Post a Comment