स्थळः लोकसत्ता संपादकाची केबिन
वेळः दिवस, तारीख आठवत नाही. संपादक खात्याची बैठक संपादक अरूण टिकेकर
रमेश देवांचे आगमन. शिपाई त्यांना थेट बैठकीत घेऊन आला. रमेश देवांचे आगमन होताच आम्ही सगळे जण उभे राहिलो. योगायोगाने ते माझ्या शेजारच्या खुर्चीत स्थानापन्न. टिकेकर आम्हा सगळ्यांचा परिचय करून देतात.
`हे रमेश झवर! ‘
‘आपण नामबंधू!’ हस्तांदोलन करत रमेश देव
‘हो. माझ्या जन्माच्या वेळी मुलामुलींचे नाव बंगाली नावांवरून ठेवण्याची पद्धत होती. माझ्या वडिलांनी बहुधा ती फॉलो केली असावी!‘
रमेश देव खळालून हसले. ता वेळाने मिटींग आटोपली.
स्थळः स्टेट बँकेत अजित वाडेकरांची केबिन. मी काही कामानिमित्त वाडेकरांना भेटायला गेलो होतो.मी त्यांच्या खोलीत बसलेलो असताना रमेश देवांचे आगमन. ते आत आल्याबरोबर वाडेकरांनी त्यांच्याशी माझा परिचय करून दिला तेव्हा ते लगेच म्हणाले,
`आपण दुस-यांदा भेटतोय्!’
`हो, योगायोग…आपण नामबंधूं ना!’
रमेश देव पुन्हा खळाळून हसले. आत मात्र मी निश्चयपूर्वक उठलो.
त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकताना हे सगळं आठवलं. रमेश देवांचे खळाळून हसणं माझ्यापुरतं तरी संपलं.
रमेश झवर
No comments:
Post a Comment