ह्या दोन्ही बातम्यातील भाषा आकर्षक आहे. वाच्यार्थाने
घ्यायीच की ख-या अर्थाने? एकूण काय की सध्या तरी काहीच लक्षात येणार नाही.
अधिक तपशीलाची वाट पाहिली पाहिजे. एकूण अमेरिकन बिझिनेसचा खाक्या लक्षात घेता
दोन्हा कंपन्या भारतातल्या प्रसारमाध्यमांत आणि लहानमोठ्या व्यवसायात हातपाय
पसरण्याच्या तयारीला लागल्या आहेत असा निष्कर्ष कढायला भरपूर वाव आहे. १९५० सालच्या
सुमारास भारतात डलडा ब्रँडनावाचे वनस्पती ऑईल विक्रीला आले. वनस्पती ऑईल काय चीज
आहे हे गरीब मधअयमवर्गिय लोकांना त्या काळात महित नव्हते. गावराणी तूप किंवा तेल
हे दोनच पर्याय त्या काळात माहित होते. हळुहळू डालडाच्या रिकाम्या डब्यात तुळस
लावण्यापर्यंत प्रगती देशात झाली!
मुकेश अंबानींच्या जिओमध्ये फेसबुकने
केलेली ९.९९ टक्के गुंतवणूक ही आतापर्यंत एखाद्या भारतीय कंपनीत झालेल्या
गुंतवणुकीत सर्वात मोठी गुंतवणूक आहे. देशभरातल्या लहानमोठ्या कंपन्यांना आवश्यक
सॉफ्टवेअरसह स्वस्त दरात ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी मुकेश अंबानींनी जिओ
प्लॅटफॉर्म कंपनी स्थापन केली. ह्या प्ल्रॅटफॉर्मार्फत लदानमोठ्या व्यपा-यांना
स्वस्तात स्वस्त दराने ब्रॉडबँड सेवा पुरवण्याची योजना जिओने ह्यापूर्वीच जाहीर
केली होती. वर्षाकाठी २० हजार रूपये किंमतीची ब्रॉडबँड सेवा अवघ्या दरमहा २००-२५०
रूपये ( म्णजे वार्षिक २४०० रूपयात ) किंमतीत पुरवण्याचे रिलयन्सने जाहीर केले
होते.
ह्यापूर्वीने केवळ डिपॉझिटच्या रकमेवर
मोबाईल आणि सिमकार्ड देण्याचा उपक्रम रिलायन्सने केला होता. त्या उपक्रमाने
व्होडाफोन आणि आयडियाचा धंदा बसला. स्पेक्ट्रमची फी भरण्याइतकेही उत्पन्न दोन्ही
कंपन्या मिळवू शकल्या नाही. दोन्ही कंपन्यांची मिळून सरकारचे ५४ हजार कोटी रूपये
थकबवले. थकबाकीचे हप्ते बांधूनही संपूर्ण देय रकम कंपनी सरकारला भऱू शकली नाही. थकबाकी
कशी फेडायची चिंता कंपन्यांना अजूनही लागलेलीच आहे. लौकरच बाजारात ५ जी सेवा
अवतरणार आहे. त्या सेवेला मागणी राहील हे उघड आहे. शेवटी फायदा रिलयान्सलाच! मोबाईल व्यवसायात उतरण्याचा प्रश्न आला त्यावेळी आपल्या बड्या अधिका-यांशी
चर्चा करताना धीरूभाई अंबानींनी असा प्रश्न केला, मोबाईल?
येस! व्हाय नॉट? सामान्य
माणसाकडे मोबाईल आलाच पाहिजे असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता.
आता सामान्य दुकानदराला, लहानफर्म्यलाही
ऑनलाईन बिझिनेस करता आला पाहिजे ह्या दृष्टीने जिओ प्लॅटफॉर्म लि. कंपनी आकार घेत
आहे. हया सेवेचा उपयोग करून पत्रकारांना वन मॅन न्यूज एजन्सी चालवता येईल. किंवा इ
बुक कंपनीदेखील चालवता येईल. किराणा दुकान. भाज्या फळे, अनेक प्रकारचा माल ऑनलाईन
मिळू लागला आहे. येणा-या काळाचा मंत्र काय असेल?
मला असे वाटते, ऑनलाईन बिझिनेस? येस! व्हय नॉट?
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment