ह्या आकडेवारीचे आणखी काही निष्कर्ष आहेत. मृत्यू पावलेल्या पहिल्या
५०० कोरोनाग्रस्तांचे सरासरी वय ६० होते. कोरोना हेच त्यांच्या मृत्यूचे कारण आहे
हे खरे असले तर त्यांच्या प्रकृतीत डायबिटीस किंवा हायपर टेन्शन इत्यादि गुंतागुंत
आधीपासूनच होती. ह्याउलट चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णात आधीपासूनच
ह्रदयरोग असलेल्यांची संख्या अधिक होती. इटालीत
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे सरासरी वय ८० आहे. सुरूवातीच्या आठवड्यात कोरोनामुळे
मृत्यू पावलेल्यांच्या आकेडेवीरीचे विश्लषेण केले तर असे लक्षात येते की कोरोनामुळे
मृत्यू पावलेल्यांची संख्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येतील २.७ लोक मृत्य
पावले. मुच्यू पावलेल्यांपैकी ०.४ टक्के माणसे
चाळीसाच्या आतली आहेत. मृत्यू पावलेली २.४ टक्के माणसे ही ४० ते ५० वयोगटातील
आहेत.
मृत्यू पावलेल्यांच्या संख्येबाबत सरासरी काढणे कितपत बरोबर आहे? अनेकांना हा प्रकार विनोदी वाटण्याचा संभव आहे! मृत्यू हा मृत्यूच आहे. परंतु १३७ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात
झालेल्या साथीच्या रोगाचा प्रादूर्भाव कितपत आणि कशा प्रकारे झाला, होत आहे हे सुज्ञांच्या
आणि नेत्यांच्याही नीट ध्यानात येण्यासाठी अकडेवारीचे चोख विश्लेषण आवश्यक आहे. त्या
विश्लेषणाच्या आधारे निर्णय घेतले तरच यश मिळते.
व्यक्तिशः मला असे वाटते पोलसांनी आणि कलेक्टकरांनी घालून दिलेल्या
शिस्तीचे जनतेने पालन केल्यास कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. आपल्या फिरण्यावर, वावरण्यावर
घालण्यात आलेली बंधने पाळली तर यश मिळणे अशक्य नाही. ह्या दरम्यान देशाचे उत्पन्न
कसे वाढेल ह्याचा वेगळ्या प्रकारे विचार करण्याकडे देशाला लक्ष देता येईल. आधी
उपचार, नंतर धनधान्य संपन्न होण्याचा विचार असला बुध्दिभेद नको. दोन्ही एकाच गोष्टी
एकाच वेळी कराव्या लागतील.
बचेंगे तो और भी लढेंगे, नही. बचेंगेभी और लडेंगे!
रमेश झवर
No comments:
Post a Comment